दोन महिन्यांत २० जणांना डेंग्यू
By Admin | Updated: August 8, 2014 01:24 IST2014-08-08T01:03:31+5:302014-08-08T01:24:23+5:30
औरंगाबाद : जुलै व आॅगस्ट महिन्यांत जिल्ह्यात ग्रामीण भागातील २० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त तपासणीतून समोर आले.

दोन महिन्यांत २० जणांना डेंग्यू
औरंगाबाद : जुलै व आॅगस्ट महिन्यांत जिल्ह्यात ग्रामीण भागातील २० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त तपासणीतून समोर आले. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत २७ रुग्णांचे रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांनी सांगितले की, जुलै महिन्यात १४, तर आॅगस्टच्या ४ तारखेपर्यंत ६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. त्यात १७ पुरुष व १० महिलांचा समावेश आहे.
गेल्या दोन महिन्यांत शहर व जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण परिसरात गेल्या दीड महिन्यात ही साथ फैलावली. संशयित ४९ रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २७ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले.
तालुकापाठविलेले लागण
नमुने
फुलंब्री८१
कन्नड१०६
सिल्लोड००
वैजापूर१०६
गंगापूर११
पैठण३३
सोयगाव००
खुलताबाद५३
औरंगाबाद२१८
एकूण४९२७