रेल्वे भाडेवाढी विरोधात निदर्शने

By Admin | Updated: June 23, 2014 00:04 IST2014-06-22T23:51:59+5:302014-06-23T00:04:10+5:30

नांदेड: केंद्र शासनाने रेल्वे भाड्यात केलेल्या तब्बल १४ टक्के दरवाढीच्या निषेधार्थ रविवारी नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली़

Demonstrations against railway fencing | रेल्वे भाडेवाढी विरोधात निदर्शने

रेल्वे भाडेवाढी विरोधात निदर्शने

नांदेड: केंद्र शासनाने रेल्वे भाड्यात केलेल्या तब्बल १४ टक्के दरवाढीच्या निषेधार्थ रविवारी नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली़ ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली़
रेल्वेअर्थसंकल्पापूर्वीच भाजपा सरकारने रेल्वे भाडेवाढ करून सामान्य जनतेला मोठा झटका दिला आहे़ या दरवाढीने महागाईत आणखी वाढ होणार असून ही दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी रविवारी रेल्वेस्थानकावर आंदोलन करण्यात आले़ सकाळी ९ वाजता झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी़आऱ कदम, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, महापौर अब्दुल सत्तार, आ़ रावसाहेब अंतापूरकर यांनी केले़ सामान्य जनतेचे हित लक्षात घेवून गेल्या दहा वर्षात युपीए सरकारने रेल्वे भाडेवाढीचा बोजा सामान्यांवर पडू दिला नव्हता़ मात्र ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित सामान्यांची फसवणूक करून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने रेल्वेअर्थसंकल्पापूर्वीची भाडेवाढ केली आहे़ रेल्वे भाडेवाढीत १४़२ टक्के आणि रेल्वे मालवाहतूक दरात ६़५ टक्के वाढ करून महागाईत तेल ओतले आहे़ ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी रल्वेस्थानकावर काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात जि़प़अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नवल पोकर्णा, प्रफ्फुल सावंत, नारायण श्रीमनवार, उमाकांत पवार, सुभाष पाटील, विनय पाटील गिरडे, मुदखेडचे नगराध्यक्ष सुनील शेट्टे, काँग्रेस मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, महिला आघाडीच्या सुमती व्याहाळकर, मंगला धुळेकर, महादेवी मठपती, रणजीतसिंघ कामठेकर, जगदीश पाटील, अविनाश कदम, दुष्यंत सोनाळे, बाळासाहेब देशमुख, आनंद गुंडिले, अपर्णा नेरलकर, रेखा चव्हाण उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Demonstrations against railway fencing