शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

लघु उद्योजकांना उद्योगासाठी भूखंड देण्याची मागणी

By admin | Updated: August 2, 2014 01:44 IST

वाळूज महानगर : उद्योगासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास एमआयडीसी प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने आजपासून बजाजनगरात भीक मांगो आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

वाळूज महानगर : उद्योगासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास एमआयडीसी प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने आजपासून बजाजनगरात भीक मांगो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तृतीय पंथियांकडून भीक मागून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.वाळूज व शेंद्रा औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून लघु व सूक्ष्म उद्योजकांनी कर्ज काढून तसेच उधारी-उसनवारी करून भाड्याचे शेड घेऊन उद्योग सुरू केले आहेत. भाड्याच्या शेडमध्ये उद्योग सुरू असल्यामुळे या लघु उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेडमालकांकडून सुविधा मिळत नसल्यामुळे, तसेच सतत भाडेवाढीचा तगादा सुरूअसल्यामुळे लघु उद्योजक त्रस्त झालेआहेत. स्वत:च्या जागेत उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसीने भूखंड उपलब्ध करून द्यावेत, यासाठी उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून एमआयडीसी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी मोर्चा, धरणे, निदर्शने, मुंडण इत्यादी आंदोलने या लघु उद्योजकांनी केली आहेत. मात्र, त्यांना भूखंड देण्यास एमआयडीसी प्रशासन टोलवाटोलवी करीत असल्यामुळे या लघु उद्योजकांत असंतोषाचे वातावरण आहे. मध्यंतरी एमआयडीसी प्रशासनाने या उद्योजकांना भूखंड देण्यासाठी सहमती दर्शविली होती. त्यानुसार जवळपास २०० लघु उद्योजकांनी भूखंडासाठी एमआयडीसीकडे प्रस्ताव दाखल केले होते. प्रस्ताव दाखल करण्यासाठी या उद्योजकांनी प्रकल्प अहवाल, नकाशा, डीडी आदींसाठी पदरमोड करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केले होते. मात्र, भूखंड देण्याऐवजी या लघु उद्योजकांना शेड भाड्याने देणाऱ्यांचा छळ एमआयडीसीने चालविल्याचा आरोप उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने करण्यात आला आहे.शिवराई पथनाक्यावर आज आंदोलन लघु उद्योजकांना हक्काचे भूखंड उपलब्ध करून द्यावेत, यासाठी सतत पाठपुरावा सुरू करूनही एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज १ आॅगस्टपासून उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने बेमुदत भीक मांगो आंदोलन सुरूकरण्यात आलेआहे.भीक मागण्यासाठी तृतीय पंथीयांची मदत घेण्यात आली असून, आज बजाजनगरात या लघु उद्योजकांनी तृतीय पंथीयांना सोबत घेऊन भीक मांगो आंदोलन सुरू केले आहे. उद्या २ आॅगस्ट रोजी शिवराई पथकर नाक्यावर भीक मांगो आंदोलन करण्यात येणार असल्याचे उद्योग क्रांती उद्योजक संघाचे अध्यक्ष सुरेश फुलारे, चंद्रशेखर शिंदे, भारत डमाळे, गोपाळराव देशमुख, जाधव यांनी सांगितले.