शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

‘विदेशी’ला मागणी वाढली

By admin | Updated: May 12, 2015 00:50 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात विदेशी मद्याची १४ टक्क्यांनी वाढीव विक्री झाली असून, देशीची विक्रीही ११ टक्क्यांनी वाढली आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात विदेशी मद्याची १४ टक्क्यांनी वाढीव विक्री झाली असून, देशीची विक्रीही ११ टक्क्यांनी वाढली आहे़ अधिकृतरित्या दारूविक्री दुकानातील वार्षिक सरासरी जवळपास १० टक्क्यांनी वाढ झाली असली तरी दुसरीकडे अवैध दारूची जिल्ह्यात विक्री जोरात आहे. अनेक गावातील ग्रामस्थांना अवैध दारूविक्री बंदीसाठी आंदोलने करावी लागत असली तरी छुप्या पध्दतीने दारूविक्री मात्र जोमात आहे़शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग असो़़ राज्य मार्ग असो अथवा ग्रामीण भागातील रस्ते असोत बिअरशॉपी, बिअरबार, ढाब्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे़ दारूमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागत असल्याने गावागावातील महिलांनी एकत्रित येवून दारूबंदीचा ठराव पारित करून घेतला आहे़ गावागावात दारूविक्रीस बंदी असली तरी आजही खुलेआमपणे दारूची विक्री केली जात आहे़ प्रशासनाची कारवाई केवळ नावालाच असल्याचे दिसून येते़ जिल्ह्यातील परवानाधारक देशी-विदेशी दारूविक्रेत्यांकडे असलेले मद्य, बिअर, वाईन हे सन २०१३-१४ पेक्षा सन २०१४-१५ मध्ये सरासरी १० टक्क्यांनी वाढीव विक्री केल्याचे दिसून येत आहे़ आर्थिक वर्ष सन २०१३-१४ मध्ये ३११५८५४ बल्कलिटर देशी दारूची विक्री झाली होती़ तर सन २०१४-१५ मध्ये यात ११ टक्क्यांनी वाढ होत ३४५४९२९ बल्कलिटर देशी दारूची विक्री झाली़ विदेशी दारूच्या विक्रीत मागील वर्षी तब्बल १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ सन २०१३-१४ मध्ये १२६५०९० बल्कलिटर विदेशी मद्य विक्री झाले होते़ तर सन २०१४-१५ मध्ये १४४३०४६ बल्कलिटर विदेशी दारूची विक्री झाली आहे़ देशी-विदेशीसह बिअरलाही जिल्ह्यातील तळीरामांनी चांगलीच पसंती दिल्याचे चित्र प्रशासनाकडील आकडेवारीवरून दिसून येत आहे़ सन २०१३-१४ मध्ये २६४२४८३ बल्कलिटर बिअरची विक्री झाली होती़ तर सन २०१४-१५ मध्ये यात ६ टक्क्यांनी वाढ होवून २८०४७६९ बल्कलिटर बिअरची विक्री झाली़ बिअरबरोबरच वाईनचेही शौकीन जिल्ह्यात वाढताना दिसत आहेत़ २०१३-१४ मध्ये १०८६१ बल्कलिटर वाईनची विक्री झाली होती यात २०१४-१५ मध्ये १३ टक्क्यांनी वाढ होत १२२५९ बल्कलिटर वाईनची विक्री झाली़जिल्ह्यात देशीदारूच्या विक्रीत ११ टक्क्यांनी, विदेशीमध्ये १४ टक्क्यांनी, बिअरमध्ये ६ टक्क्यांनी तर वाईनच्या विक्रीत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ ही आकडेवारी परवानाधारक दुकानामधील असली तरी अवैध दारूविक्रीचा महापूर पाहता दारूविक्री यापेक्षाही मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने कारवाईचे सत्रही राबविले. सन २०१३-१४ मध्ये वारस ३३८ तर बेवारस ४६८ अशा एकूण ७९६ केसेस करण्यात आल्या होत्या़ यात ३३२ जणांना अटक करण्यात आली होती़ त्यांच्याकडून ४९ लाख ९६ हजार ७३७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ सन २०१४-१५ मध्ये ६७० केसेस करण्यात आल्या आहेत़ यात वारस केसेस ३७४ व बेवारस केसेस २९६ करण्यात आल्या आहेत़ या कारवाईत ३८० जणांना अटक करण्यात आली होती़ तर वर्षभरात या कारवाईतून ७४ लाख ८२ हजार २११० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)