शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: November 18, 2014 23:35 IST

भाजपाची आक्रमक भूमिका : डॉक्टरवर हल्ला करणाऱ्यास व्हीआयपी वागणूक

ओरोस : जिल्हा रूग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय ढवळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताला व्हीआयपी वागणूक दिली होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांची भेट घेतली. या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी भाजपने केली.
जिल्हा रूग्णालयात प्रामाणिक काम करणारे डॉ. ढवळे यांच्यावर आजपर्यंत अनेक राजकीय आणि संशयित लोकांनी हल्ले केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरून येणारे डॉक्टर हे आपल्याकडे येऊन काम करण्यास तयार होत नाहीत.
राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे पोलीस संशयितांना अटक करू शकत नसल्यामुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडाला असल्याबद्दल बोलले जात आहे. त्यामुळे आज जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी व गुरूवारपर्यंत चौकशीचे आदेश देण्याचे बाविस्कर यांना शिष्टमंडळाने सांगितले.जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन डॉ. ढवळे व त्यांच्या वडीलांची विचारपूस केली. डॉ. ढवळे यांना मारहाण झाल्यानंतर असंख्य फोन आले, पण त्यावेळी कोणीही मदतीला धावून येऊ शकले नाही. आजच्या भेटीदरम्यान डॉ. ढवळे यांनी जिल्हा सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नये व आपण आजपर्यंत जनतेची जी सेवा केली तशीच सेवा करावी. या रूग्णालयात लहान मुलांच्या आजाराविषयी ज्या अडचणी येतात त्या तुम्ही चांगल्याप्रकारे हाताळता. आज हजारो बालके तुम्ही चांगली केली आहेत.
जिल्हा रूग्णालयाला तुमच्यासारखा वैद्यकीय अधिकारी मिळाला आहे, अशी त्यांच्याकडे सर्वांनी विनवणी केली.
यावेळी भाजपचे शिष्टमंडळाचे माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, राजश्री धुमाळे, अतुल काळसेकर, जयदेव कदम यांनी डॉ. आर. डी. माने व डॉ. विजय ढवळे यांची भेट घेतली. (वार्ताहर)