दांडेगावकरांना महिलांचा घेराव

By Admin | Updated: August 4, 2014 00:52 IST2014-08-03T23:50:09+5:302014-08-04T00:52:29+5:30

शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील चोंढी शहापूर येथे अवैध दारूची खुलेआम विक्री होत असल्यामुळे महिलांना मोठा त्रास होत आहे.

Dedgegaonkar women wandering around | दांडेगावकरांना महिलांचा घेराव

दांडेगावकरांना महिलांचा घेराव

शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील चोंढी शहापूर येथे अवैध दारूची खुलेआम विक्री होत असल्यामुळे महिलांना मोठा त्रास होत आहे. त्रासलेल्या या महिलांनी राष्ट्रवादीच्या शाखा उद्घाटनासाठी गावात आलेले आ. जयप्रकाश दांडेगावकर यांना रविवारी घेराव घातला. तातडीने गावातील दारुविक्री बंद करण्याची मागणी महिलांनी केली.
शिरडशहापूर, चोंढी शहापूर, सेंदूरसना, लोहरा, लक्ष्मण नाईक तांडा, औंढा, वसमत रस्त्यावर आदी ठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध धंदेचालकांची चांदी होत आहे. शिरडशहापूर, चोंढी, कुरूंदा, गिरगावात मटका, जुगार व किराणा दुकानामध्ये दारुविक्री सुरू आहे. यामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्रासलेल्या या महिलांनी १ आॅगस्ट रोजी आ. दांडेगावकर यांना चोंढी शहापूर येथे घेराव घालून ही दारुविक्री बंद करण्याची मागणी केली.
आ. दांडेगावकर यांनी हट्टा, कुरूंदा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती देऊन परिसरातील अवैध धंद्याविरोधात कारवाईचे निर्देश दिले. सरपंच शंकर काळे यांना गावातील या प्रकाराकडे लक्ष घालण्यासही सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Dedgegaonkar women wandering around