लग्नपत्रिका घेवून जाणाऱ्या वधूपित्याचा मृत्यू

By Admin | Updated: April 20, 2016 23:56 IST2016-04-20T23:45:43+5:302016-04-20T23:56:26+5:30

देगलूर : मुलीच्या विवाहाच्या तयारीत असलेल्या पित्याचा देगलूरच्या जुन्या बसस्थानक परिसरात मृत्यू झाला़ २० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली़

Death of a bridegroom carrying a marriage booklet | लग्नपत्रिका घेवून जाणाऱ्या वधूपित्याचा मृत्यू

लग्नपत्रिका घेवून जाणाऱ्या वधूपित्याचा मृत्यू

देगलूर : मुलीच्या विवाहाच्या तयारीत असलेल्या पित्याचा देगलूरच्या जुन्या बसस्थानक परिसरात मृत्यू झाला़ २० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली़ मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी उष्माघाताने किंवा हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे़
देगलूरपासून सहा ते सात कि़मी़ अंतरावरील डोंगळी (ता़मदनूर, तेलंगणा) येथील सय्यद अब्दुल सय्यद शादुलसाब (वय ४०) यांच्या मुलीचे लग्न जमल्याने देगलूर येथून कोऱ्या लग्नपत्रिका खरेदी करून गावाकडे परत जात होते़ जुन्या बसस्थानक परिसरातील चाणक्य मेडिकलच्या ओट्यावर चक्कर आल्याने बसले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला़ स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली़ मयत सय्यद अब्दुल यांची उत्तरीय तपासणी येथील उपजिल्हा रुग्णालयात करून प्रेत त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ मयताचा भाऊ सय्यदसाब शादुलसाब यांच्या तक्रारीनुसार देगलूर पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली़ उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे पुढील तपास करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Death of a bridegroom carrying a marriage booklet