शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या सीए विद्यार्थ्यांचा देशात डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:03 IST

सीए विद्यार्थी संघटनेच्या १८० शाखा देशभरात कार्यरत आहेत. या सर्व शाखांमधून औरंगाबादेतील सीए विद्यार्थी संघटनेने दिल्ली गाजविली. खुद्द केंद्रीय राज्यमंत्री पी.पी. चौधरी व आयसीएआय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव करीत द्वितीय पुरस्कार प्रदान केला.

ठळक मुद्देद्वितीय पुरस्कार : वर्षभरातील सर्वोत्कृष्ट कार्याचा दिल्लीत गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सीए विद्यार्थी संघटनेच्या १८० शाखा देशभरात कार्यरत आहेत. या सर्व शाखांमधून औरंगाबादेतील सीए विद्यार्थी संघटनेने दिल्ली गाजविली. खुद्द केंद्रीय राज्यमंत्री पी.पी. चौधरी व आयसीएआय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव करीत द्वितीय पुरस्कार प्रदान केला. उल्लेखनीय म्हणजे पश्चिम विभागातील तीन राज्यांतून सर्वोत्कृष्ट शाखेचा बहुमान या एकाच सीए विद्यार्थी संघटनेला मिळाला.आयसीएआय संघटनेच्या वतीने दिल्लीत आयोजित शानदार सोहळ्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. भिलाई येथील सीए विद्यार्थी संघटना देशभरातील सीए विद्यार्थी संघटनेमधून नंबर वन ठरली. त्यांनी ६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सीएच्या अभ्यासक्रमाबद्दल जागृती निर्माण केली.औरंगाबादेतील सीए संघटनेने वर्षभरात विविध उपक्रम राबविले. यात जीएसटी, रेरा, ई-वे बिल यासंदर्भात जनजागृती कार्यक्रम घेतलेच, शिवाय गुरुपौर्णिमा उत्सव व शहीद जवानांच्या परिवाराला सन्मानित केले व आर्थिक मदत दिली. तसेच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वासही त्यांना दिला. विद्यार्थी संघटनेने वार्षिक परिषदही एक योद्धा म्हणून गाजविली.सीए विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए रोहन आचलिया, उपाध्यक्ष ऐश्वर्या ब्रह्मेचा व सचिव रोहन खंडेलवाल यांनी पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र, गोवा व गुजरात या पश्चिम विभागातील तीनही राज्यांत मिळून या एकाच संघटनेला पुरस्कार मिळला.औरंगाबाद सीए संघटनेचे अध्यक्ष सीए अल्केश रावका व सर्व पदाधिकाºयांचे विद्यार्थी संघटनेला मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा शहरातील सर्व सीए विद्यार्थी व सीएंचा विजय आहे, असे प्रतिपादन सीए रोहन आचलिया यांनी व्यक्त केले.यावेळी संघटनेचे अभिनव शर्मा, मंजिरी महतोले, श्रेया लड्डा, रोहन मुगदिया, राशी तोतला यांनी वर्षभर परिश्रम घेतले.