शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतरचा हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
6
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
10
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
11
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
12
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
13
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
14
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
15
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
16
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
19
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
20
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूची पकड शहरावर घट्ट

By admin | Updated: September 10, 2014 00:53 IST

औरंगाबाद : डेंग्यूसदृश आजाराची शहरावर पकड घट्ट होत चालली असून, चिकलठाणा, सिंधी कॉलनी परिसरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले

औरंगाबाद : डेंग्यूसदृश आजाराची शहरावर पकड घट्ट होत चालली असून, चिकलठाणा, सिंधी कॉलनी परिसरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले असून, त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनपाने प्रभाग ‘ई’ आणि ‘ब’ डेंग्यूसदृश आजारासाठी डेंजर झोनमध्ये असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील डेंग्यू व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मार्ग नाही. शहरातील काही भागांमध्ये डेंग्यूचा प्रसार ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे.
डेंग्यूचा डास ४ कि़ मी. अंतरात प्रवास करतो. त्यामुळे डेंग्यू डासांची अंडी व रोगाचा प्रसार वेगाने झाला असून, अख्खे शहर डेंग्यूच्या विळख्यात आले आहे. आॅगस्ट महिन्यात दोन कोम्बिंग आॅपरेशन होऊन शहर ४० टक्के डेंग्यूच्या विळख्यात आलेच कसे हा प्रश्न आहे.
आयुक्त म्हणाले...
डेंग्यू व इतर साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभागाला त्यासंबंधी आदेश दिले आहेत, असे आयुक्त पी. एम. महाजन म्हणाले.
नगरसेवक भेटले..
आयुक्त महाजन यांची काही नगरसेवकांनी भेट घेतली. पुण्याहून आलेल्या पथकाने प्रभाग ‘ई’ व ‘ब’ मध्ये डेंग्यूचा सर्वाधिक प्रभाव असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही नागरिकांचे स्थलांतर होत असल्याचा दावा नगरसेवक काशीनाथ कोकाटे, गटनेते मीर हिदायत अली, जुबेर गाझी, ख्वाजा शरफोद्दीन यांनी केला. सर्व शहर डेंग्यूच्या विळख्यात आलेले असताना पालिकेने दोन प्रभागांना का लक्ष्य केले, याची विचारणा आयुक्तांकडे नगरसेवकांनी केली.
आयुक्तांनी विश्रामगृह बदलले
डासांमुळे आयुक्त महाजन यांनी अजिंठा हे विश्रामगृह सोडले. त्यांनी अ‍ॅनेक्समधील सूटमध्ये बिऱ्हाड हलविले आहे. शहरात डासांचे प्रमाण वाढल्याची जाणीव आयुक्तांनाही झाली असल्याने त्यांनी डेंग्यूवर नियंत्रण हेच पहिले काम हाती घेण्याचे ठरविले आहे. तत्कालीन आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे हे नागपूर येथे एनआयटी चेअरमनपदी बदली होऊन गेले आहेत. ते १३ सप्टेंबर रोजी शहरात येतील. १५ सप्टेंबर रोजी ते आयुक्तांचे शासकीय निवासस्थान ‘जलश्री’ रिक्त करतील. त्यानंतर आयुक्त महाजन यांना ‘जलश्री’ चा ताबा मिळेल. तोपर्यंत महाजन हे विश्रामगृहात थांबणार आहेत.
डासांचे नमुने पुन्हा घेतले
पुणे आरोग्य विभागाच्या सूचनेवरून आज पुन्हा काही भागातील डासांचे नमुने मनपा कर्मचाऱ्यांनी घेतले आहेत. ते नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. १२ सप्टेंबर रोजी पुण्यात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
सर्वसाधारणपणे डेंग्यूचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार हा व्हायरल फिव्हरमुळे होणारा डेंग्यू आहे. यामध्ये रुग्णाला साधा ताप येतो. पॅरासिटामोल या औषधीने तो ताप बरा होतो. या तापेत रुग्णाला मोठ्या प्रमाणात पाणी देणे गरजेचे असते. ‘ह्युमरोजेक फिव्हर’ हा दुसरा, तर तिसरा प्रकार शॉक सिंड्रोम हा आहे. हे दोन्ही प्रकार रुग्णांसाठी घातक असतात. या प्रकारचा डेंग्यू झाला तर रुग्णाची काळजी घ्यावी लागते.