शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

त्रुटीची सेवा दिल्याने नुकसान भरपाईचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:33 IST

परभणी : ग्राहकाला त्रुटीची सेवा दिल्याच्या कारणावरून आयडीया सेलूलर सर्व्हिसेस या कंपनीने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी,

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्राहकाला त्रुटीची सेवा दिल्याच्या कारणावरून आयडीया सेलूलर सर्व्हिसेस या कंपनीने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे़ या प्रकरणाची माहिती अ‍ॅड़ पवन उपाध्याय यांनी दिली़ शीतल विनोदकुमार साखला यांनी आयडीया कंपनीविरूद्ध जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती़ साखला यांनी पोर्टेबिलीटी सेवे अंतर्गत त्यांचा मोबाईल क्रमांक आयडीया कंपनीतून व्होडाफोन कंपनीत परावर्तीत केला होता़ व्होडाफोन कंपनीची सेवा काही दिवस वापरल्यानंतर कंपनीने साखला यांना कोणतीही पूर्वसूचना न देता आयडीया सेलूलर सर्व्हिसेसच्या सांगण्यावरून थकीत देयक न भरल्या प्रकरणी त्यांची मोबाईल सेवा खंडित केली होती़ हे प्रकरण न्यायमंचात दाखल झाल्यानंतर आयडिया सेल्युलर सर्व्हिसेसने व्होडाफोन मोबाईल कंपनीस केलेली विनंतीही टेलीकॉम रेग्युलॅरिटी अँड अ‍ॅथॉरिटी अ‍ॅक्ट नियमांचे उल्लंघन करणारी आहे़ अर्जदारास थकीत देयकासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता अर्जदार वापरत असलेली मोबाईल सेवा खंडित करणे चुकीचे आहे़ त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यान्वये आयडीया सेल्युलर सर्व्हिसेसने केलेले कृत्य त्रुटीचे ठरते, असे साखला यांच्या वतीने अ‍ॅड़ पवन उपाध्याय यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचच्या निदर्शनास आणून दिले़