शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती सुधार योजना राजकीय कचाट्यात

By admin | Updated: June 26, 2017 00:14 IST

नांदेड: शहरी भागातील दलित वस्ती सुधार योजनेतून प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या तब्बल ९ कोटींच्या कामांना पालकमंत्र्यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले आहे़

अनुराग पोवळे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरी भागातील दलित वस्ती सुधार योजनेतून प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या तब्बल ९ कोटींच्या कामांना पालकमंत्र्यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले आहे़ परिणामी शहरातील अनेक दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांची कामे ठप्प झाली आहेत़ याविरोधात आता न्यायालयात जाण्याची तसेच रस्त्यावर आंदोलनाचा इशारा मनपातील सत्ताधाऱ्यांनी दिल्ोा आहे़महापालिकेला २०१६-१७ या आर्थिक वर्षात १६ कोटी ८६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ या निधीतून महापालिकेने निश्चित केलेल्या ११९ कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत़ ११ मे २०१७ रोजीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ९ कोटी ९ लाख ९२ हजारांच्या ६८ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती़ मात्र मंजुरी दिलेल्या कामांपैकी काही कामे ही दलित वस्ती बाहेरची असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़ तसेच काही कामांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या़ पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी या तक्रारींची तत्काळ दखल घेत मंजूर झालेल्या कामांची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले़ ही चौकशी पूर्ण होईपर्यंत निविदा काढण्यात येवू नयेत, असेही आदेश पारित केल्याने ९ कोटींची कामे खोळंबली आहेत़ दलित वस्ती निधीतील कामांची चौकशी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे़ यासाठी जिल्हास्तरावर नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक ती तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशित केले आहे़ ही चौकशी अद्याप सुरू झाली की नाही ही बाब गुलदस्त्यात असली तरी पालकमंत्री खोतकर यांच्या प्रत्येक नांदेड दौऱ्यात या विषयावर चर्चा होते़ अन् हा प्रश्न लवकरच निकाली काढू असे आश्वासन पालकमंत्र्यांकडून देण्यात येते़ त्याचवेळी दलित वस्ती कामांना प्रशासकीय मंजुरी देणाऱ्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारीच आहेत़ त्यामुळे स्वत:च मंजुरी दिलेल्या कामांची चौकशी करण्याची वेळ जिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे़दलित वस्तीच्या पहिल्याच टप्प्यातील ९ कोटींच्या ६८ कामांना राजकीय ग्रहण लागल्याने अन्य कामे तर रखडलीच आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर आता आंदोलनाची तयारी काँग्रेस नगरसेवकांकडून केली जात आहे़ रस्त्यावरील लढाईसह न्यायालयीन लढाईचाही अवलंब केल्या जाईल, अशी माहिती काँग्रेसचे सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी दिली आहे़