शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यावरून तलाठ्यांचा कारभार

By admin | Updated: June 27, 2014 00:13 IST

जालना : लोकमतने गुरूवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अनेक सज्जे तलाठ्यांविनाच आढळून आले.

जालना : लोकमतने गुरूवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अनेक सज्जे तलाठ्यांविनाच आढळून आले. बहुतांश तलाठी तालुकास्थानावरून कारभार चालवित असल्याचे धक्कादायक चित्र समारे आले.वाटूर फाटा : वाटूर फाटा हे गाव दोन तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण. सोयीनुसार या ठिकाणी मंठा तालुक्यातील तीन तलाठी कार्यालये आहेत. त्यात वैद्यवडगाव, पांगरी व सरकटे वझर या सज्जांचा समावेश आहे. तिनही कार्यालयांना गुरूवारी भेटी दिल्या तेव्हा तलाठी साहेब गैरहजर असल्याचे दिसून आले. मात्र, खाजगी कर्मचारी कामात दंग होते. एका तलाठ्याकडे तीन सज्जाचा कारभार असल्याची माहिती हाती आली. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. परतूर तालुक्यातील दोन तलाठी वाटूरफाटा येथूनच काम पाहतात. बाबुलतारा सज्जा अंतर्गत दहिफळ भोंगाणे, वाढोणा सज्जा अंतर्गत श्रीधर जवळा, कंडारी असे तीन गावे असे मिळून सहा गावांच कार्यभार यांच्याकडे आहे. तर वाटूर, एदलापूर, पिंपरखेडा ही तीन गावे अन्य एका तलाठ्याकडे आहेत. त्यांचा मोबाईल नेहमी बंद राहतो रोहिलागड : अंबड तालुक्यातील सज्जाचे हे ठिकाण. ५ हजार एवढी गावची लोकसंख्या. परंतु सज्जास्थानी तलाठी फिरकतच नाही. २२ कि़मी. अंतरावरील अंबड येथील स्वत:च्या निवास्थानातूनच तलाठी महाशय गावगाडा सांभाळतात. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात फेरफटका मारला. तेव्हा १५ ते २० ग्रामस्थ ‘साहेबां’च्या प्रतीक्षेत होते. साहेब काही आलेच नाहीत... मोबाईल सुरू होता... अंबडला या... असा निरोप दिला जात होता. प्रत्येक कामाकरिता ग्रामस्थांना अंबडला घरी किंवा तहसीलमध्ये धाव घ्यावी लागते. एखाद्या एजंटांशी संपर्क केल्यानंतरच काम फत्ते होते, असा सर्रास अनुभव येथील ग्रामस्थांना आहे. तळणी : तळणी, दुधा, उस्वद, शिरपूर या सजाचे काम तळणी सजातून चालते. बहुतांश तलाठी गावात येत नसल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत. एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असून, तलाठी शक्यतो मंठ्यावरुच कारभार पाहतात. तलाठ्यांनी सजावर येऊन शेतकऱ्यांचा कामाचा निपटारा करावा, असा नियम असला तरी बहुतांशी तलाठी मंठा येथेच या आज मिटिंग आहे आज ट्रेनिंग आहे असे सांगून शेतकऱ्यांनाच मंठा येथे बोलविले जात असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. अनेकदा तालुकास्थानी जाऊनही शेतकऱ्यांची कामे होतील याशी शाश्वती नसते. सज्जावर थांबणे तलाठ्यांना बंधनकारक करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)