बनावट क्रमांक टाकल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:31+5:302021-02-05T04:12:31+5:30
औरंगाबाद : जमिनीच्या व्यवहारातून दुचाकी घेतल्यानंतर तिच्यावर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या तिघाजणांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात ...

बनावट क्रमांक टाकल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : जमिनीच्या व्यवहारातून दुचाकी घेतल्यानंतर तिच्यावर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या तिघाजणांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ जानेवारीला दुपारी ४ वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीस्वार शेख जुबेर शेख शकील, रमजान शहा यांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा विकारोद्दीन अलीओद्दीन सय्यद (रा. गल्ली क्र. १०, मिसारवाडी) याच्याकडून जमिनीच्या व्यवहारातून ही दुचाकी ३० हजारांत घेतल्याचे दोघांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी विकारोद्दीनशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने आपण धुळ्याला असल्याचे सांगितले. पोलिसांनी चेसीस क्रमांकावरून दुचाकीचा मालक शेख इरफान शेख उस्मान (रा. जहांगिर कॉलनी) याचा शोध घेतला. तेव्हा शेख इरफान यांच्याशी संपर्क केला व खात्री करून घेतली. तेव्हा दुचाकीचा मूळ क्रमांक (एमएच-२०-ईझेड-६४१३) असताना नंबर प्लेखवर मात्र बनावट क्रमांक (एमएच-२०-जीझेड-६५१५) होता. त्यावरून गुन्हे शाखेचे शिपाई विजय भानुसे यांच्या तक्रारीवरून शेख जुबेर, रमजान शहा आणि विकारोद्दीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.