चारचाकी अडवून चाकूच्या धाकावर दांपत्याला लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:23 IST2019-05-18T16:21:19+5:302019-05-18T16:23:30+5:30

चोरट्यांनी त्यांची गाडी आडवी लावली

couple lootet at kaygaon | चारचाकी अडवून चाकूच्या धाकावर दांपत्याला लुटले 

चारचाकी अडवून चाकूच्या धाकावर दांपत्याला लुटले 

कायगाव (औरंगाबाद ) : औरंगाबाद- अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरील कायगाव नजिक कार अडवून चाकूचा धाक दाखवत दांपत्याला लुटल्याची घटना शनिवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी पहाटे पुण्याहून यवतमाळला जाणाऱ्या दांपत्याच्या कार समोर दरोडेखोरांनी त्यांची कार आडवी लावली. यावेळी पाच ते सहा जणांनी कार मधील दांपत्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असणारे मंगळसूत्र, सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण साठ हजारांचा माल लुटला. त्याच सुमारास कायगाव पेपर मिल जवळ रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करून झोपलेल्या एका ट्रक चालकाच्या खिशातील दोन हजार रुपयांची रक्कम ही चोरट्यांनी धाक दाखवून चोरून नेली. 

यानंतर दांपत्याने तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आणि गंगापूर पोलीस  घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तात्काळ राष्ट्रीय मार्गावरील लिंबेजळगाव आणि खडकाफाटा येथील टोलनाक्यावर नाकाबंदी केली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुख्य मार्गांवर चोरांच्या शोधार्थ गस्त वाढवली आहे.

Web Title: couple lootet at kaygaon