शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

"संस्कृत शिकता आले नाही, ही आयुष्यात राहून गेलेेली गोष्ट..."

By शांतीलाल गायकवाड | Updated: August 10, 2024 12:45 IST

‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ साकारणारे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे ९१ व्या वर्षात पदार्पण; ‘लोकमत’शी दिलखुलास संवाद

शांतीलाल गायकवाड -

छत्रपती संभाजीनगर : हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविणारे मराठी भाषेचे शिक्षक व मराठी वाङ्मयात ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे तपस्वी डॉ. सुधीर रसाळ हे शनिवारी (दि. १० ऑगस्ट) वयाची नव्वदी पूर्ण करीत आहेत. कठोर परिश्रम व सचोटीने क्षेत्रात आपले आगळेवेगळे ‘प्रतिष्ठान’ निर्माण करणाऱ्या शेकडो मानसन्मान प्राप्त सरांना आपण संस्कृत शिकू शकलो नाही याची आजही खंत वाटते. 

रसाळ सरांचा नव्वदीतही तोच जोम व जोश हा सळसळत्या तारुण्यालाही लाजविणाराच. आजही नित्यनेमाने त्यांचे वाचन, लेखन सुरू आहे. शतकी वाटचालीकडे निघालेल्या रसाळ सरांच्या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ या १६ व्या पुस्तकाचे प्रकाशन आणि सत्कार सोहळा शुक्रवारी झाला.   

सरांना नेमकी खंत काय असेल? असे विचारले असता ते सांगतात, मला  संस्कृत शिकता आले नाही, ही आयुष्यात राहून गेलेली गोष्ट व त्याची आजही खंत वाटते. संस्कृत भाषेत भरत मुनी, आनंद वर्धन, अभिनव गुप्त व मंमट यांनी ज्या प्रकारे समीक्षेची भर घातली ती मला मुळापासून समजून घेता आली नाही. मूलभूत विचार समजून घेणे व भाषांतर वाचून समजून घेणे यात फरक असतो व तो कायम राहिला आहे. भाषांतरित वाचल्यामुळे वरील विभूतींच्या कलाकृतीची सत्यता तपासता आली नाही. 

समीक्षेवर कुणाचा प्रभाव?  
रसाळ सर म्हणाले, गंगाधर गाडगीळ, बा. सी. मर्ढेकर व वा. ल. कुलकर्णी यांच्या समीक्षेने मला भुरळ पाडली. तार्किकदृष्ट्या त्यांच्या व माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत मला साम्य आढळले. त्यांच्या समीक्षेचा माझ्यावर निश्चितच प्रभाव आहे. 

पाश्चात्त्य समीक्षेच्या कुबड्या नको  
लेखकाचे पुस्तक वाचल्यावर त्यातील गुण-दोष जेव्हा मी दाखवितो, त्या वेळेस मी कटाक्षाने त्यांच्या भूमिकेबद्दल, दोषाबद्दल लिहितो. व्यक्तिगत टीका केली नाही व करत नाही. माझ्या लेखनामुळे काही लेखक दुखावले; पण मी कधी आकस धरला नाही.

पाश्चात्त्य समीक्षेच्या कुबड्या टाकून स्वतंत्रपणे विचार करायला हवा. जोपर्यंत स्वतंत्र विचाराने एखाद्या कलाकृतीकडे पाहणार नाही, तोपर्यंत त्याची गुणग्राहकता दाखविता येणार नाही, असा सल्लाही ते उदयोन्मुख समीक्षकांना देतात. 

गांधेलीच्या सुपुत्राची गरुडझेप
रसाळ कुटुंब मूळचे गांधेलीचे. (ता. जि. छत्रपती संभाजीनगर). त्यांच्या वडिलांकडे या गावची पाटीलकी व कुळकर्णीकी होती. सुधीर रसाळ यांचा जन्म १० ऑगस्ट १९३४ रोजी वैजापुरात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा योगही त्यांना आला. शासकीय कला महाविद्यालय व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यापन त्यांनी केले.