औरंगाबाद : कोरोनाच्या संशयावरून शहरातील २१ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच शहरातील कोरोना संशयितांची संख्या दोन वर गेली आहे. त्यांच्या टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतरच कोरोनाची लागण आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मित्र सौदी अरेबियातून आला असून त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याला सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरु झाला. यामुळे त्याला लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पण काळजीचे कारण नसून केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णाला भरती करण्यात आले आहे.
शहरात आतापर्यंत १४ रुग्ण कोरोना आयसोलेशन वार्डात आलेले आहेत. त्यापैकी १२ रुग्णांना घरीच वेगळं राहण्याचा सल्ला देण्यात आलेले असून त्यांच्यावर डॉक्टरांचे लक्ष आहे. तर एक रुग्ण घाटीत तर आज एक मिनी घाटीत भरती करण्यात आलेला आहे. लक्षणे आहेत म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, स्वबचा रिपोर्ट आल्यावर त्याबद्दल निश्चित बोलता येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले.
corona virus : औरंगाबादमधील कोरोना संशयिताच्या प्रकृतीत सुधारणा नाही
दरम्यान, घाटीत कोरोना उपचारासाठी सिव्हिटीएस आयसीयूत भरती असलेल्या १६ वर्षीय युवकाची तब्बेत चिंताजनक आहे. त्याला कृत्रिम श्वाशोस्वासाचा आधार देण्यात आला असून पुढील उपचार सुरु असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.