जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १३ प्रकरणे पात्र
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. बैठकीत दाखल झालेल्या १६ प्रकरणांवर चर्चा केली. त्यातील १३ प्रकरणे पात्र ठरली. १ प्रकरण अपात्र तर २ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार मिळवा व ते कुटुंब आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टीने उभारी उपक्रम जिल्ह्यात राबविण्याबाबतचे सादीकरण बैठकीत करण्यात आले.
अॅट्रॉसिटी प्रकरणांतील गुन्ह्यांचा तपास वेगाने करा
औरंगाबाद : जिल्ह्यातील अन्याय, अत्याचार, गुन्हेगारीस आळा बसून गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने अॅट्रॉसिटी प्रकरणांतील गुन्ह्यांचा तपास वेगाने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी दिले जानेवारी २०२१ या महिन्यात जिल्ह्यातील शहर भागात ०३, ग्रामीण भागात ०५ अशा एकूण ०८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्या प्रकरणांच्या तपासाबाबतदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
लोकशाही दिनात ६ अर्जांवर सुनावणी
औरंगाबाद: फेब्रुवारी महिन्याच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये ६ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनात महसूल - ३, पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण - ३, महावितरण - ३, सार्वजनिक बांधकाम विभाग - १ असे एकूण ६ अर्ज निकाली काढण्यात आले.
''बेटी बचाव बेटी पढाओ; आढावा बैठक
औरंगाबाद: जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण समान पातळीवर आणण्यासाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या उपक्रमातंर्गत मुलींच्या जन्मदरात वाढ, शिक्षण, बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी समाजमनाच्या मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ टास्क फोर्सने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्स आराखड्याच्या आढावा बैठक सोमवारी झाली.