शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा संकल्प आणि रिपाइंचा कार्यकर्ता मेळावा

By admin | Updated: July 26, 2014 01:09 IST

औरंगाबाद : श्रीहरी पार्क येथे काँग्रेसचा विभागीय संकल्प मेळावा व सिडको नाट्यगृहात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे शनिवारी (दि.२६) आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : श्रीहरी पार्क येथे काँग्रेसचा विभागीय संकल्प मेळावा व सिडको नाट्यगृहात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे शनिवारी (दि.२६) आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री व रिपाइंचे खा. रामदास आठवले आणि चित्रपट अभिनेत्री राखी सावंत शहरात येत आहेत. विधानसभेच्या तयारीसाठी काँग्रेसतर्फे राज्यात विभागीयस्तरावर पक्ष कार्यकर्त्यांचे संकल्प मेळावे आयोजित केले जात आहेत. शहरात शनिवारी दुपारी १२ वाजता शहानूरमियॉ दर्गा परिसरातील श्रीहरी पव्हेलियनमध्ये मेळाव्यास सुरुवात होईल. आ. माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मेळाव्यास राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा. राजीव सातव, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम, सरचिटणीस किरण पाटील, राजकुमार जाधव यांनी केले आहे. रिपाइंचा मेळावा सिडको नाट्यगृहात दुपारी एक वाजता सुरू होईल. खा. आठवले, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा राखी सावंत, प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर,अविनाश महातेकर, राजा सरवदे, अर्जुन डांगळे, अ‍ॅड. गौतम भालेराव, मिलिंद शेळके, दौलत खरात, कांतीकुमार जैन, पी. के. जैन, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष किशोर थोरात यांनी केले.