शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
5
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
6
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
7
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
10
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
11
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
12
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
13
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
14
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
15
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
16
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
17
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
18
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
19
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
20
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

औरंगाबादबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीचे श्रेष्ठीच बॅकफूटवर; निवडणुकांची जुजबी तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 6:26 PM

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना औरंगाबाद जिल्ह्याबद्दल फारशी आशाच राहिलेली नाही.

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : सततच्या अपयशामुळे काँग्रेस (Congres ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) औरंगाबाद जिल्ह्यात आगामी सर्वच निवडणुकांच्या (Aurangabad Municipal Corporation )  पार्श्वभूमीवर बॅकफूटवरच असल्याचे जाणवत आहे. पक्ष म्हटल्यानंतर निवडणुकांना सामोरे जाणे आलेच, परंतु एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा भाजप (BJP ) आणि शिवसेनेचा ( Shiv Sena ) बालेकिल्ला बनला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना औरंगाबाद जिल्ह्याबद्दल फारशी आशाच राहिलेली नाही. आहे ती परिस्थिती सुधारली तरी खूप झाले, अशी मानसिकता दिसून येते. त्यामुळेच दोन्ही पक्षांनी नेमून दिलेले संपर्कमंत्री इकडे कित्येक महिने फिरकत नाहीत.

नानांमुळे चैतन्यकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेस मरगळ झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु नाना पटोले यांच्या वेगाने स्थानिक पदाधिकारी मेहनत करताना दिसत नाहीत. शिवाय, नानाभाऊंना काँग्रेसच्याच मंत्र्यांची साथ दिसत नाही, हे आता जाणवायला लागले आहे. प्रख्यात बुद्ध-भीम गायिका कडूबाई खरात यांना काँग्रेसने घर देण्याच्या कार्यक्रमाचा चांगला इव्हेंट केला. या घरभरणीनिमित्त शहरभरातून चांगली गर्दी झाली. एक चांगला मेसेज गेला. नाना पटोले यांच्या कामाची शैलीच न्यारी. ते चहापाण्यानिमित्त दोन-चार कार्यकर्त्यांच्या घरी जातातच. त्यातून एक माहोल बनविण्यात ते यशस्वी होत आहेत. त्यांच्या या जनसंपर्काचा काँग्रेसला मनपाच्या आगामी निवडणुकीत फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

बाकी आनंदीआनंद...नाना पटोले वजा केले तर औरंगाबादेत काँग्रेसची अजिबात उल्लेखनीय कामगिरी नाही, वाॅर्ड अध्यक्ष, बूथ कमिट्यांचा पत्ता नाही. गांधी भवनातील कार्यक्रमांना हजेरी लावणे, स्टेज तुटेपर्यंत गर्दी करणे, खुर्चीसाठी भांडणे याच बाबी ठळकपणे घडतात आणि लक्षात राहतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉरर्मन्सही फार उल्लेखनीय नाही. या दोन्ही पक्षांचे जिल्ह्यात आमदार खासदार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही बोटावर मोजता येतील एवढेच प्रतिनिधी आहेत.

भुजबळांमुळे ओबीसी आकर्षितशरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील आले तरच त्यांच्या अवतीभवती गर्दी होते. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ नुकतेच औरंगाबादला येऊन गेले. त्यांचे कट्टर समर्थक मनोज घोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती करून ओबीसींना आकर्षित करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. इकडे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात वक्ता सेलच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. हल्ली राजकीय पक्षांना प्रशिक्षणाचे वावडे असताना राष्ट्रवादीचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हटला पाहिजे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका