शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची तक्रार : निवडणूक आयोगाने मागविला अहवाल

By admin | Updated: May 6, 2014 16:10 IST

फैझाबाद : भाजपाच्या जाहीरनाम्यात अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्याला अग्रक्रम नसावा

फैझाबाद : भाजपाच्या जाहीरनाम्यात अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्याला अग्रक्रम नसावा, यासाठी आग्रही राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील फैझाबादेत मतांसाठी राम धून आळवली. फैझाबाद येथे प्रचारसभेत मोदी यांच्या मंचावर भगवान रामाचे मोठे ‘पोस्टर’ लावण्यात आले होते. मोदी यांनी प्रत्यक्ष राममंदिर निर्मितीच्या मुद्यावर कुठलेही भाष्य केले नाही; परंतु भाषणादरम्यान वारंवार रामनाम घेतले. त्यांनी प्रचारात धर्माचा वापर केल्याच्या मुद्यावरून काँग्रेस कमालीची आक्रमक झाली असून निवडणूक आयोगाने या सभेचा अहवाल मागितला आहे. अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी याच फैझाबाद मतदारसंघात आहे. येथील भाषणात मोदींकडून सतत रामाचा उल्लेख आला. निवडणुकीत जनतेने जिंकून दिल्यास देशात रामराज्य आणेन , असा दावा मोदींनी केला. मोदी म्हणाले, भगवान रामाच्या या भूमीतील लोक ‘प्राण जाए पर वचन न जाए’ या उक्तीवर विश्वास ठेवतात. सत्तेत असलेल्या पक्षांनी १० कोटी रोजगार निर्माण करण्यात येतील अशी घोषणा केली होती. हे आश्वासन पूर्ण न करणार्‍यांना ते माफ करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोदी देशात रामराज्य आणण्याची भाषा करीत आहेत. मग त्यांनी गुजरातमध्ये रामराज्य का आणले नाही, गुजरातमध्ये अत्याचारांंचे सत्र अजूनही सुरूच आहे. ते रामराज्याचा वापर फक्त मतांसाठी करीत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसच्या अखिलेश प्रतापसिंह यांनी टीका केली आहे. समाजवादी पार्टी आणि बसपा हे पक्ष लखनौमध्ये शत्रू आणि दिल्लीत मित्र आहेत. ते केंद्रातील सरकार वाचवतात. काँग्रेस त्यांना सीबीआयपासून वाचवते, अशी टीका मोदी यांनी केली.