शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेगा’ची ६ हजार कामे पूर्ण

By admin | Updated: September 4, 2014 01:25 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात १ लाख ८७ हजार २४१ कुटुंब महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत असून, ५ लाख २ हजार ९४७ मजुरांची नोंदणी आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यात १ लाख ८७ हजार २४१ कुटुंब महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत असून, ५ लाख २ हजार ९४७ मजुरांची नोंदणी आहे. त्यापैकी आजघडीला १३ हजार १०१ मजुरांच्या हाताला काम आहे. योजना लागू झाल्यापासून लातूर जिल्ह्यात ५ हजार ९२३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१४-१५ साठी ८.५५ लक्ष मनुष्यदिनाचे असून, त्यापैकी १०.१४ लक्ष मनुष्य दिन निर्मिती झाली आहे. जुलैअखेर ६५८ कामे सुरू करण्यात आली. त्यावर १३ हजार १०१ मजुरांना रोजगार देण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यात ७१, औसा तालुक्यात २०५, चाकूर तालुक्यात ४४, देवणी तालुक्यात ७८, जळकोट तालुक्यात ३४, लातूर ३६, निलंगा ८५, रेणापूर ६०, शिरूर अनंतपाळ ४३, उदगीर ११ अशी एकूण ६६७ कामे ग्रामपंचायतस्तरावर सुरू आहेत. या कामांवर अहमदपूर तालुक्यात ८१०, औसा तालुक्यात ९४१६, चाकूर तालुक्यात ५८८, देवणी तालुक्यात ९३६, जळकोट तालुक्यात ८६६, लातूर तालुक्यात ४६९, निलंगा तालुक्यात ९३५, रेणापूर तालुक्यात १३१९, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ५९३, उदगीर तालुक्यात ८४८ अशा एकूण १६ हजार ७८० मजुरांना गेल्या आठवड्यात काम देण्यात आले होते. या मजुरांकडून रोपवाटिका, सिंचन विहिरी, पाणंदमुक्त रस्त्याचे काम करण्यात येत आहेत. शिवाय, काही कामे सुरूही आहेत. मागील आठवड्यात अहमदपूर तालुक्यात ४ कामांवर ५६, औसा तालुक्यात १० कामांवर ४१, जळकोट तालुक्यात ३७ कामांवर १५४, लातूर तालुक्यात ७ कामांवर ८४, निलंगा तालुक्यात १३ कामांवर ६५, रेणापूर तालुक्यात ४ कामांवर १३२, उदगीर तालुक्यात ५ कामांवर ४२ अशा एकूण ८० कामांवर ५७४ मजुरांची उपस्थिती होती. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जुलैअखेर ६५८ कामे सुरू करण्यात आली होती. ही कामेही प्रगतीपथावर असून, या कामासाठी प्रतीदिनी १३ हजार १०१ इतके मजूर उपस्थित होते. ४१ एप्रिल २००८ पासून लागू झालेल्या या योजनेत जिल्ह्यामध्ये १ लाख ८७ हजार २४१ कुटुंबांतील ५ लाख २ हजार ९४७ मजुरांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीकृत मजुरांना रोजगार हमी योजनेत काम देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. मनुष्य दिनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्नही प्रशासनाकडून केला जात आहे.