शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, रुग्णवाहिका प्रकरणी न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे निर्देश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:10 IST

२०१४ मधील एका जुन्या प्रकरणावरून सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: शिंदे सरकारच्या काळात विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिलेले शिवसेनेचे माजी मंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. २०१४ मधील एका जुन्या प्रकरणावरून सिल्लोड न्यायालयानेपोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुढे आल्याने सत्तार यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

काय आहे ३२ लाखांच्या रुग्णवाहिकांचे प्रकरण?२०१४ मध्ये अब्दुल सत्तार मंत्री असताना त्यांनी आपल्या आमदार निधीतून प्रत्येकी १६ लाख रुपयांच्या दोन रुग्णवाहिका (एकूण ३२ लाख रुपये) खरेदी केल्या होत्या. शासकीय नियमांनुसार, सरकारी पैशाने खरेदी केलेल्या रुग्णवाहिका कोणत्याही खासगी रुग्णालयाला किंवा संस्थेला देता येत नाहीत. मात्र, सत्तार यांनी हा नियम धाब्यावर बसवून, शासनाची कोणतीही परवानगी न घेता या दोन्ही रुग्णवाहिका आपल्याच 'प्रगती शिक्षण संस्थेला' दिल्या. सत्तार यांच्या 'नॅशनल एज्युकेशन सोसायटी' (ज्याचे ते स्वतः अध्यक्ष आणि पत्नी सचिव आहेत) या संस्थेला रुग्णवाहिका देताना, ती संस्था आपलीच आहे, ही बाब त्यांनी शासनापासून लपवली, असा आरोप आहे. तक्रारदार आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपल्ली यांनी सांगितले की, "सत्तार यांनी शासनाच्या संपत्तीचा अपहार केला आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी आणि उपसचिव यांनी कागदपत्रे न तपासता मंजुरी दिली.

कोर्टाकडून पोलिसांना 'अल्टीमेटम'या गैरव्यवहाराविरोधात तक्रारदार गणेश शंकरपल्ली यांनी सिल्लोड पोलिसांत आणि नंतर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली, पण दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शंकरपल्ली यांनी फौजदारी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने १ नोव्हेंबर रोजी सिल्लोड पोलिसांना एका महिन्याच्या आत या तक्रारीची सत्यता तपासून आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ऐन निवडणुकीत कोंडी?या न्यायालयीन निर्देशामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार आहेत. विधानसभा निवडणूक जिंकल्यापासून सिल्लोड नगरपरिषदेवर आपली एकहाती सत्ता कायम ठेवण्यासाठी सत्तार मतदारसंघ सोडून कुठेही गेलेले नाहीत. बोगस मतदार, रोहिंग्या प्रकरणावरून किरीट सोमय्यांसारख्या विरोधी नेत्यांनी आधीच त्यांना घेरले आहे. त्यातच, आता 'रुग्णवाहिकेसाठी निधीचा गैरवापर' प्रकरणाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्तार यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Court orders probe against Abdul Sattar in ambulance case.

Web Summary : Abdul Sattar faces investigation over alleged misuse of funds in 2014. He is accused of improperly allocating ambulances purchased with government funds to his own educational institution. Court orders probe after inaction by police on initial complaint.
टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCourtन्यायालयPoliceपोलिस