शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांच्या चौकशीसाठी समिती

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

बीड : शिक्षक बदल्यांतील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली़ ही समिती चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे़

बीड : शिक्षक बदल्यांतील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली़ ही समिती चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे़ जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी स्थायी समितीची बैठक झाली़ त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला़ झेडपीआरवरुन सभागृहात गोंधळ उडाला़गुरुवारी दुपारी दीड वाजता स्थायी समितीच्या बैठकीला प्रारंभ झाला़ यावेळी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, सभापती गयाबाई आवाड, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती यांची प्रमुख उपस्थिती होती़ बैठकीच्या सुरुवातीलाच जि़ प़ सदस्य विजयसिंह पंडित यांनी शिक्षक बदल्यांमधील अनियमिततेच्या कळीच्या मुद्द्याला हात घातला़ बजरंग सोनवणे यांनी पंडित यांचा मुद्दा पुढे रेटत अनियमिततेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी लावून धरली़ त्यानंतर विशेष समिती नेमण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले़ विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे, दशरथ वनवे, महेंद्र गर्जे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती, शिक्षणाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी यांचा या समितीत समावेश राहील़वैद्यकीय सुविधा पुरवाजि़ प़ सदस्य विजयसिंह पंडित यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली़ काही डॉक्टर रुजू होऊन उच्च शिक्षणासाठी निघून जातात़ त्यांचा नियमित पगार निघतो मात्र आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला असतो़ त्यामुळे उच्च शिक्षणासाठी डॉक्टर पाठविताना रुग्ण वाऱ्यावर राहणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी मागणी त्यांनी केली़ (प्रतिनिधी)अन् ते फिरकलेच नाहीतभाजप गट नेते मदनराव चव्हाण यांनी झेडपीआरच्या काही संचिका नियमबाह्यरीत्या जि़ प़ मध्ये फिरवल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला़विजयसिंह पंडित यांनी देखील हाच मुद्दा उचलून धरला़त्यानंतर अध्यक्ष अब्दुल्ला यांनी झेडपीआरची इत्यंभूत माहिती मागविली़ बांधकामचे अधिकारी माहिती आणण्यासाठी गेले ते परत फिरकलेच नाहीत़त्यानंतर गोंधळ उडाला आणि बैठक आटोपती घेण्यात आली़