बदल्यांच्या चौकशीसाठी समिती

By Admin | Updated: July 25, 2014 00:28 IST2014-07-24T23:26:33+5:302014-07-25T00:28:12+5:30

बीड : शिक्षक बदल्यांतील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली़ ही समिती चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे़

Committee to inquire for transfers | बदल्यांच्या चौकशीसाठी समिती

बदल्यांच्या चौकशीसाठी समिती

बीड : शिक्षक बदल्यांतील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली़ ही समिती चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे़ जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी स्थायी समितीची बैठक झाली़ त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला़ झेडपीआरवरुन सभागृहात गोंधळ उडाला़
गुरुवारी दुपारी दीड वाजता स्थायी समितीच्या बैठकीला प्रारंभ झाला़ यावेळी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, सभापती गयाबाई आवाड, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती यांची प्रमुख उपस्थिती होती़ बैठकीच्या सुरुवातीलाच जि़ प़ सदस्य विजयसिंह पंडित यांनी शिक्षक बदल्यांमधील अनियमिततेच्या कळीच्या मुद्द्याला हात घातला़ बजरंग सोनवणे यांनी पंडित यांचा मुद्दा पुढे रेटत अनियमिततेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी लावून धरली़ त्यानंतर विशेष समिती नेमण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले़ विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे, दशरथ वनवे, महेंद्र गर्जे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती, शिक्षणाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी यांचा या समितीत समावेश राहील़
वैद्यकीय सुविधा पुरवा
जि़ प़ सदस्य विजयसिंह पंडित यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली़ काही डॉक्टर रुजू होऊन उच्च शिक्षणासाठी निघून जातात़ त्यांचा नियमित पगार निघतो मात्र आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला असतो़ त्यामुळे उच्च शिक्षणासाठी डॉक्टर पाठविताना रुग्ण वाऱ्यावर राहणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी मागणी त्यांनी केली़ (प्रतिनिधी)
अन् ते फिरकलेच नाहीत
भाजप गट नेते मदनराव चव्हाण यांनी झेडपीआरच्या काही संचिका नियमबाह्यरीत्या जि़ प़ मध्ये फिरवल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला़
विजयसिंह पंडित यांनी देखील हाच मुद्दा उचलून धरला़
त्यानंतर अध्यक्ष अब्दुल्ला यांनी झेडपीआरची इत्यंभूत माहिती मागविली़ बांधकामचे अधिकारी माहिती आणण्यासाठी गेले ते परत फिरकलेच नाहीत़
त्यानंतर गोंधळ उडाला आणि बैठक आटोपती घेण्यात आली़

Web Title: Committee to inquire for transfers