शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसाठी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: September 12, 2014 00:31 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू नियंत्रणासाठी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन सुरू केले आहे

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू नियंत्रणासाठी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन सुरू केले आहे. आॅगस्ट महिन्यात दोन आॅपरेशन करूनही डेंग्यू व साथरोग आटोक्यात आले नाहीत. त्यामुळे १३ सप्टेंबरपर्यंत साथरोगसदृश भागात अ‍ॅबेट वाटप, फॉगिंगचा आराखडा मनपाने तयार केला आहे. तसेच आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी खाजगी डॉक्टर्सची बैठक घेऊन कार्यशाळा आयोजनाच्या अनुषंगाने चर्चा केली. पवननगर, श्रीकृष्णनगर, मयूरनगर, यादवनगर, हर्सूल, वानखेडेनगर, जाधववाडी, सिडको एन-८, अयोध्यानगर, ब्रिजवाडी या विभागात व प्रभाग ‘ई’ मधील पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, अंबिकानगर, एन-३, एन-४, ठाकरेनगर, जयभवानीनगर या अति जोखमीच्या भागांमध्येही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रभाग ‘ब’ची डॉ. संध्या टाकळीकर तर ‘ ई’ प्रभागाची डॉ. वंदना तिखे यांच्यावर जबाबदारी आहे. आरोग्य अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी खाजगी डॉक्टर्सची बैठक घेतली. यावेळी आयएमएचे डॉ. लाठी, डॉ. राऊळ, डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. वर्षा आपटे, डॉ. कस्तुरे, डॉ. शिंदे, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. श्याम खंडेलवाल, डॉ. गुळवे, डॉ. संतोष ढोके, डॉ. धर्माधिकारी, डॉ.आसने, डॉ.मालू आदींची उपस्थिती होती.