शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना आखण्यासाठी कट्टीबद्ध

By admin | Updated: August 15, 2014 00:06 IST

नांदेड : शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना आखण्याच्याबाबतीत नेहमीच कटीबद्ध राहू असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़

नांदेड : शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना आखण्याच्याबाबतीत नेहमीच कटीबद्ध राहू असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़ मुदखेड तालुक्यातील बोरगाव येथील सीता नदीवरील साखळी सिमेंट नाला बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळ्यात गुरूवारी ते बोलत होते़ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या लघुसिंचन-जलसंधारणांतर्गत पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील ६७ साखळी बंधाऱ्यांचे लोकार्पण एकाच दिवशी करण्यात आले़ त्याचा मुख्य समारंभ बोरगाव येथे झाला़ पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांच्या हस्ते बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले़ अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा़ चव्हाण हे होते़ ते म्हणाले, बंधाऱ्यांच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी अडविले जात आहे़ भोकर मतदारसंघात जवळपास २५ कोटी रूपयांचे बंधारे मंजूर करून घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले़ पाण्यामुळे आता प्रादेशिक वाद होवू लागले आहेत़ ते टाळण्यासाठी कृषी क्षेत्रात सुक्ष्म सिचंनाच्या ठिबक योजनेचा वापर वाढवावा़ राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्वच तालुक्यात टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे़ शासनाने नेहमीच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न केला आहे़ टंचाई परिस्थिती जाहीर केल्याने त्यातून मिळणाऱ्या सवलती आणि सुविधांबाबत प्रशासनाने लक्ष घालावे अशी सूचनाही खा़ चव्हाण यांनी केली़पालकमंत्री सावंत म्हणाले, टंचाई परिस्थिती घोषीत केल्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिलात, शेतसारा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि कृषी संजीवनी योजनेतून सवलती दिल्या जातील़ लोकार्पण होत असलेली बंधाऱ्यांची योजना महत्वपूर्ण असल्याचे सांगताना जिल्हा वार्षिक योजनेतूनही सूक्ष्मसिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले़ कार्यक्रमास मुदखेड पं़ स़ च्या सभापती शोभाताई मुंगल, उपसभापती सुनील देशमुख, जि़ प़ सदस्य प्रतिभा देशमुख, रोहिदास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, कृषी अधीक्षक संजीव पडवळ, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एम़ आऱ उप्पलवाड, बाळासाहेब देशमुख, गोविंदराव शिंदे, कुसूमबाई बंडे, गणपतराव तिडके, उपविभागीय अधिकारी केशव नेटके आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)