शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका क्षेत्रात ‘स्वच्छता मार्शल’

By admin | Updated: July 10, 2014 00:59 IST

उस्मानाबाद : शहराच्या प्रत्येक भागातील स्वच्छतेबाबत नगरपालिकांनी तातडीने पावले उचलावीत.

उस्मानाबाद : शहराच्या प्रत्येक भागातील स्वच्छतेबाबत नगरपालिकांनी तातडीने पावले उचलावीत. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत जागृती करावी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. प्रत्येक वॉर्डात नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता समित्या कार्यान्वित झाल्या नसतील तर त्याचा अहवाल सादर करा. यापुढे परिसर स्वच्छतेबाबत दिरंगाई करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मार्शल नेमण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक नगर पालिकांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या कार्यवाहीच्या मूल्यमापनासाठी एकमेकांच्या कार्र्यक्षेत्रात संबंधितांना तपासणीसाठी पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात शहर स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत डॉ. नारनवरे यांनी सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, नागरी विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कुरवलकर आदींची यावेळी उपस्थिती होती.नगरपालिकांनी अजूनही नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत कार्यवाही केलेली नाही. नागरिकांमध्ये जागृती करुन ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्याबाबतची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहर स्वच्छतेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासकीय पातळीवर केले जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दोन-तीन नगरपालिकांनी मिळून घनकचरा व्यवस्थापनाबाबत एकत्रित प्रकल्प सुरु करता येईल का. याची माहिती घेऊन कार्यवाही करण्याबाबत सुचित केले. कचरा विलगीकरण ही आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे नगरपालिकांनी याचा पाठपुरावा करावा, असे स्पष्ट निर्देशह त्यांनी दिले.कचरा संकलित करण्याबाबत नियमित कार्यवाही करावी. व्यापारी आस्थापनांकडून सशुल्क कचरा संकलन करावे. प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छता कमिटी कार्यान्वित झाल्या नसतील तर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी तसा अहवाल पाठवावा. संबंधित वॉर्डमध्ये अस्वच्छता निर्माण झाली तर त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)