शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीकडून नालीची सफाई

By admin | Updated: June 11, 2016 00:16 IST

वाळूज महानगर : लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारी अयोध्यानगर नाल्यालगत असलेल्या नालीची सफाई करून ड्रेनेज व सांडपाण्याची विल्हेवाट लावली.

वाळूज महानगर : लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारी अयोध्यानगर नाल्यालगत असलेल्या नालीची सफाई करून ड्रेनेज व सांडपाण्याची विल्हेवाट लावली. अनेक दिवसांपासून दुर्गंधीने त्रस्त झालेल्या नागरिकांची अखेर दुर्गंधीतून सुटका झाल्याबद्दल लोकमतचे आभार मानले आहेत.अयोध्यानगरातून वाहणाऱ्या नाल्यालगत बजाजनगरात नाली तुंबल्याने ड्रेनेज व सांडपाणी उघड्यावरच साचले होते. अनेक वेळा सांगूनही एमआयडीसी प्रशासन नालेसफाईकडे लक्ष देत नव्हते.त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत होता. लोकमतने वृत्त प्रकाशित करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मांडला होता. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एमआयडीसी प्रशासनाने तुुंंबलेल्या नालीची साफसफाई केली व साचलेल्या ड्रेनेज आणि सांडपाणी जाण्यास मार्ग मोकळा करून दिला. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारी बजाजनगरातील तुंबलेल्या नालीची साफसफाई करून सांडपाणी जाण्यास मार्ग मोकळा करून दिल्याने नागरिकांची दुर्गंधीतून सुटका झाली. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने दोन दिवसांत नाल्याची साफसफाई केली. लोकमतमुळे या भागातील नागरिकांची दुर्गंधीतून सुटका झाली आहे, असे माजी ग्रा.पं. सदस्य सतीश पाटील, मनिष तोतला, सुशांत भुजंग, अशोक दोमाटे, सिद्राम पारे, सुरेश गाडेकर, अंकुश पुंड, उमेश नवले, मंगेश मुंडे, सचिन हातोळे, अक्षय शिंदे आदींनी सांगितले.