शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नागरी पाणीपुरवठा योजना बारगळली !

By admin | Updated: January 14, 2015 00:58 IST

लातूर : लोकसंख्येच्या प्रमाणात दरवर्षी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून नगरपालिकांना निधी देण्यात येतो.

लातूर : लोकसंख्येच्या प्रमाणात दरवर्षी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून नगरपालिकांना निधी देण्यात येतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून लातूर जिल्ह्यातील चारही नगरपालिकांचेप्रस्ताव राज्य शासनाकडे धूळ खात पडून आहेत. अहमदपूर नगरपालिकेने तर वारंवार पाठपुरावा करूनही या योजनेचा निधी शासनाकडून मिळू शकला नाही. परिणामी, ही योजनाच बारगळण्याच्या मार्गावर आहे.नागरी भागातील दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याची सोय करण्यासाठी नगरपालिकांमार्फत नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना राबविण्यात येते. राज्य शासनाकडून त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी पुरविला जातो. दलित वस्तीत पाणीपुरवठ्याची कामे करण्यासाठी स्थानिक समिती गठित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. पाणीपुरवठा समितीच्या सभापतींच्या अध्यक्षतेखाली एक अशासकीय सदस्य, दोन मागासवर्गीय प्रतिनिधी, एक मागासवर्गीय नगरसेवक आदींचा या समितीत समावेश आहे. या समितीने सुचविलेल्या ठिकाणी पाणीपुरवठ्याची सोय करण्याचे या योजनेत अभिप्रेत आहे. प्रारंभी योजना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही नगरपालिकांना या योजनेअंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळाला. मात्र गेल्या तीन वर्षांपासून प्रस्ताव पाठवूनही निधी मिळत नाही. अहमदपूर नगरपालिकेलातीन वर्षांपूर्वी १० लाख रुपये मिळाले होते. परंतु, योजनेसाठी अटींमध्ये बदल करण्यात आला. जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता घेण्याची अट लादण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रस्ताव पाठवूनही निधी मिळाला नाही. जिल्ह्यातील चारही पालिकांत ही स्थिती आहे.अहमदपूर नगरपालिकेच्या हद्दीतील दलित वस्त्यांमध्ये या योजनेतून प्रारंभी १० लाखांची कामे झाली होती. त्यामुळे या पालिकेने पुन्हा प्रस्ताव शासनाकडे सादर केले. ४जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता घेण्याची अट आल्यानंतरही प्रस्ताव सादर केला. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून या योजनेचा निधी अहमदपूर पालिकेला मिळू शकला नाही. त्यामुळे विनाकारण वेळ गेला. सभापतींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या स्थानिक समितीने पाठपुरावा करूनही शासनाने निधी दिला नसल्याचे अहमदपूर पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. ४अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर या चारही नगरपालिकांना या योजनेत निधी मिळू शकला नाही. शिवाय, निधी मिळत नसल्यामुळे नगरपालिकांनीही प्रस्ताव सादर करणे बंद केले आहे. नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना वस्त्यांमध्ये राबविण्यासाठी समितीने सुचविलेल्या कामांसाठी जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यतेची अट ठेवण्यात आली आहे. जीवन प्राधिकरणाकडून मान्यता मिळण्यास अडसर येतो. त्यावर मात करूनही प्रस्ताव दिले असताना शासनाकडून निधी मिळत नसल्याचे या पालिकांतील पाणीपुरवठा समितीच्या सभापतींचे म्हणणे आहे.