शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या वाळू वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त; अपघातही वाढले

By admin | Updated: June 16, 2014 01:13 IST

धारूर: सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास उघड्यावर वाळू वाहतूक केली जात आहे. खाजगी वाहनधारक क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे.

धारूर: सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास उघड्यावर वाळू वाहतूक केली जात आहे. खाजगी वाहनधारक क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. ही वाळू झाकून नेत नसल्याने याचा त्रास सर्वसामान्यांसह दुचाकीस्वारांना होत आहे. दुचाकीस्वार आदी वाहनधारकांना या वाळूचा त्रास होत आहे. अवैध व उघड्यावर वाळू वाहतूक केली जात असतानाही प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे.तेलगाव-धारूर-केज हा रस्ता तालुक्यातील प्रमुख वाहतुकीचा मार्ग आहे. या रस्त्यावर सध्या वाळू वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून ट्रक, ट्रॅक्टर, टिप्पर शिगोशिग भरून या रस्त्यावरून वाळू वाहतूक करीत आहेत. केज, कळंब, धारूर तालुक्यातील या रस्त्यावरून वाळू वाहतूक केली जाते. हे शिगोशिग भरलेली वाहने रस्त्यावरून जाताना वाळू सांडत जातात. या वाहनातून रस्त्यावर पडलेल्या वाळूमुळे दुचाकी घसरून पडत आहेत, अशा घटना या अगोदर अनेकवेळा घडल्या आहेत. अशा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रशासनाकडूनच अभय मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत, डॉ. आसाराम घोळवे यांनी केला आहे. याबाबत तहसीलदार संदीप कुलकर्णी म्हणाले, आम्ही या वाहनांवर कारवाई करू, नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ. (वार्ताहर)