शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात चोरी-छुपे ‘दम मारो दम’चा धंदा जोरात सुरूच!

By admin | Updated: June 14, 2016 00:09 IST

औरंगाबाद : तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याने शासनाने राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणलेली आहे. मात्र, आजही शहरातील अनेक छोट्या हॉटेल्स,

 

औरंगाबाद : तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याने शासनाने राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणलेली आहे. मात्र, आजही शहरातील अनेक छोट्या हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये चोरी-छुपे हुक्का पार्लर चालविले जात आहेत. बुढीलेन येथे पाकिजा हॉटेलच्या बाजूला रविवारी सिटीचौक पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दररोज रात्री उशिरापर्यंत येथे उच्चभ्रू वर्गातील केवळ मुलेच नव्हे तर मुलीदेखील येथे झुरके मारत बसलेल्या असतात. गेल्या काही वर्षांमध्ये युवा पिढीत हुक्का पिणे एक ‘स्टेटस’चा भाग बनलेले आहे. तरुणांबरोबरच अनेक तरुणी हुक्क्याच्या आहारी गेलेल्या आहेत. चार वर्षांपूर्वीपर्यंत अनेक हॉटेल, कॉफी शॉप्स, रेस्टॉरंटमध्ये राजरोसपणे हुक्का पार्लर चालायचे. अनेक मोठ्या महाविद्यालयांच्या जवळपास खास हुक्का पार्लरच सुरू झालेले होते. हुक्क्यामुळे युवा पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने अखेर हुक्क्यावर बंदी आणली. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारून हे पार्लर बंद पाडले. मात्र, बंदी असली तरी आजही चोरी-छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी हे हुक्का पार्लर सुरूच आहेत. सिटीचौक परिसरातील बुढीलेनमध्ये पाकिजा हॉटेलजवळ अशाच चोरी-छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर रविवारी रात्री सिटीचौक पोलिसांनी छापा मारून तेथून पार्लरचालकासह १५ जणांना पकडले. त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. अँटी चेंबरसारख्या खोल्या... सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आजही औरंगाबाद शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप्समध्ये हुक्का पार्लर सुरू आहेत. उस्मानपुरा परिसरात काही हॉटेल, पानटपऱ्यांवर हुक्का देण्यात येतो. शिवाय सिडको परिसर, निरालाबाजार परिसर, दौलताबाद रोडवरील मोठ्या हॉटेलमध्येही छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालविण्यात येत आहेत. तसेच बीड बायपास रोडवर एमआयटी महाविद्यालयाच्या आसपास दोन ठिकाणी आणि जालना रोडवर (पान ४ वर) शासनाने हुक्का पार्लरवर बंदी तर आणली आहे; परंतु ते चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष असा कोणताही कायदा नाही. त्यामुळे पार्लर चालविणाऱ्याला पकडल्यानंतर पोलिसांना मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार साधा अदखलपात्र गुन्हा दाखल करावा लागतो. त्यामुळे आरोपींची तात्काळ पोलीस ठाण्यातून मुक्तता करावी लागते. अशा कुचकामी कायद्यामुळेच बंदी असतानाही हुक्का पार्लर चालविण्याचे धाडस अनेक जण करीत आहेत. काल सिटीचौक पोलिसांनी बुढीलेनमध्ये पकडलेल्या पार्लरचालकाची ही पकडल्या जाण्याची तिसरी वेळ होती, असे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले.४ एकीकडे हुक्का पार्लरवर बंदी आहे. तर दुसरीकडे हुक्क्यासाठी लागणारी गुडगुडी, त्यासाठी लागणारे फ्लेव्हर व इतर साहित्याची औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा परिसर, दिल्लीगेट, कॅनॉट गार्डन, टीव्ही सेंटर परिसरातील पानटपऱ्यांवर राजरोसपणे विक्री सुरू आहे. त्याकडे पोलीस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे, हे विशेष. 1 हुक्का पाजण्यातून मोठी कमाई होत असल्यानेच बंदी असतानाही ‘रिस्क’ घेऊन चोरी-छुपे हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉपचालक हा धंदा करीत आहेत. चारशे ते सातशे रुपयांमध्ये एका ग्रुपला १ तास हुक्का पिण्यासाठी देण्यात येतो. 2 फ्लेव्हरनुसार त्याचे दर ठरविले जातात. एका दिवसात एका पार्लरमध्ये केवळ हुक्क्यातून आठ- दहा हजारांची कमाई होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासोबत जेवण, चकणाचे इतर बिल वेगळेच असते.