शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीम औरंगाबाद’च्या माध्यमातून तयार होतोय शहराचा जाहीरनामा

By admin | Updated: September 10, 2014 00:53 IST

औरंगाबाद : आतापर्यंत आपण विविध पक्षांचा, उमेदवारांचा जाहीरनामा पाहिला आहे; परंतु ‘टीम औरंगाबाद’ बनविणार आहे

औरंगाबाद : आतापर्यंत आपण विविध पक्षांचा, उमेदवारांचा जाहीरनामा पाहिला आहे; परंतु ‘टीम औरंगाबाद’ बनविणार आहे आपल्या औरंगाबादचा पहिला जाहीरनामा़ संपूर्ण औरंगाबाद शहरात सर्वेक्षण करण्यात येत असून ‘टीम औरंगाबाद’चे स्वयंसेवक ५० हजार नागरिकांना भेटणार आहेत़ येणाऱ्या पाच वर्षांत औरंगाबादवासीयांना आपले शहर कसे हवे आहे, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे टीम औरंगाबादच्या वतीने सांगण्यात आले़ राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली टीम औरंगाबादची स्थापना करण्यात आली़ विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राजेंद्र दर्डा यांनी टीम औरंगाबाद ही संकल्पना मांडली आहे़ औरंगाबाद शहरातील विकासात सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढावा हाच या ‘टीम औरंगाबाद’चा मुख्य उद्देश असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले़ विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यासह समाजातील प्रत्येक घटकाने विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, शहरातील समस्यांना वाचा फोडावी, गैरप्रकारांना विरोध करावा आणि त्यासोबतच आपल्याकडील नावीन्यतम संकल्पना - सूचना सर्वांसमोर मांडव्यात हे टीम औरंगाबादच्या स्वयंसेवकांकडून अपेक्षित आहे़ टीम औरंगाबादच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ टीम औरंगाबादने आता संपूर्ण औरंगाबाद शहराचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे़ येणाऱ्या पाच वर्षांत औरंगाबादवासीयांना आपले शहर कसे हवे आहे, हे जाणून घेण्यासाठी टीम औरंगाबादचे स्वयंसेवक शहरातील ५० हजार नागरिकांना भेटून प्रश्नावली भरून घेत आहेत़ या सर्वेक्षणातून पहिल्यांदाच औरंगाबादचा जाहीरनामा तयार होईल़ येणाऱ्या पाच वर्षांत औरंगाबादकरांना काय हवे आहे ते या जाहीरनाम्यातून स्पष्ट होणार आहे़ फेसबुकवरील ‘टीम औरंगाबाद’ हे पेज लाईक करून इच्छुकांनी टीम औरंगाबादच्या उपक्रमांना सर्मथन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ ऐतिहासिक औरंगाबाद आता उद्योगनगरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे़ त्यामुळे या शहरात जेवढ्या संधी उपलब्ध होत आहेत, तेवढीच आव्हानेदेखील वाढली आहेत़ ही आव्हाने पेलण्यासाठी औरंगाबाद शहरात कोणते बदल अपेक्षित आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे़ याच उद्देशाने टीम औरंगाबाद हे सर्वेक्षण करीत असून औरंगाबादच्या उज्ज्वल भविष्याचा जाहीरनामा या उपक्रमातून तयार होत आहे़ -राजेंद्र दर्डा, (शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र)