शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

केज शहरात थाटली पुन्हा अतिक्रमणे !

By admin | Updated: May 28, 2014 00:20 IST

मधुकर सिरसट , केज तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यकाळात केज शहरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. परंतु त्याच जागेवर आता अतिक्रमणे पुन्हा थाटू लागल्याने रस्ते अरुंद पडले आहेत.

मधुकर सिरसट , केज तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यकाळात केज शहरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. परंतु त्याच जागेवर आता अतिक्रमणे पुन्हा थाटू लागल्याने रस्ते अरुंद पडले आहेत. अतिक्रमणे वाढत असतानाही याकडे सा.बां. विभाग, नगर पंचायत यांची डोळेझाक होत आहे. काही महिन्यापूर्वीच शहरातील अतिक्रमणे तहसीलदार, सा.बां. विभागाचे उपअभियंता, जि.प. बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता, गटविकास अधिकारी, नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन राज्य महामार्गावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. परंतु प्रशासन आणि नगर पंचायतीने या प्रकाराकडे कानाडोळा केल्यामुळे अतिक्रमण हटविलेल्या जागेवर हळुहळू हातगाडे आले त्यानंतर छोटे-मोठे व्यापारी आले. आता शेड उभारण्याच्या कामाने गती घेतली असली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, प्रशासन मूग गिळून गप्प आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण धारकांचे धाडस वाढले असून, पुन्हा या मार्गावरुन वाहतुकीला अडथळा सुरू झाला आहे. याप्रकरणी प्रशासनाने, संबंधित विभागातील अधिकार्‍यांनी बघ्याची भूमिका घेतल्यास आठ दिवसात अतिक्रमणधारक पूर्ववत अतिक्रमणे करण्यास वेळ लागणार नाही, असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. समन्वयाचा अभाव याप्रकरणी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आणि जि.प. बांधकाम उपविभागाचे अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यामुळेच अतिक्रमणे वाढू लागली आहेत. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार या प्रतीक्षेत एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू असल्याचे एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मटण मार्केटचा प्रश्न चिघळला राज्य रस्त्यावर सर्रास बकरे, कोंबडे कापण्यात येत असल्यामुळे व याच रस्त्यालगत मासे विक्रीही होत असल्यामुळे रस्त्यावरुन येणार्‍या-जाणार्‍या पादचार्‍यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधी वाढली असून, नाकाला रुमाल लावूनच रस्त्यावरुन पादचार्‍यांना चालावे लागत आहे. राज्य रस्त्यावर मांस आणि मासे विक्रीसाठी पर्यायी जागा द्यावी व रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, या मागणीसाठी केज तालुका पत्रकार संघ सरसावला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी दिली. कायदेशीर कारवाई करणार राज्य रस्त्यावर उघड्यावर मांस आणि मासे विक्री करणार्‍या व्यापार्‍यांना नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांनी आपापली राज्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून त्यांच्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. नोटीस देऊनही त्यांनी आपला व्यवसाय न थांबविल्यास संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास कोकरे म्हणाले.