शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आधार नोंदणीकडे नागरिकांची पाठ

By admin | Updated: June 17, 2014 01:13 IST

उस्मानाबाद : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

उस्मानाबाद : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी आधार कार्ड नोंदणीची सोय केली आहे. परंतु, जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ११ लाख ९७ हजार ४० जणांनी आधार कार्डची नोंदणी केली असली तरी पाच लाख नागरिकांनी अद्याप याकडे फारसे गांभिर्याने पाहिल्याचे दिसत नाही. बँकेमध्ये खाते उघडायचे असो अथवा शासकीय सवलती घ्यायच्या असो. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बँक खाते काढण्यासाठीही आधार कार्ड गाह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने मागील तीन वर्षापासून आधार कार्ड नोंदणी करण्यात येत आहे. प्रारंभी या नोंदणीस शहरी व ग्रामीण भागातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, गॅस सिलेंडर, रॉकेल अनुदान व इतर शासकीय योजना यासाठी नागरिकांना या कार्डची गरज भासत असल्याने नागरिकांनी नोंदणी करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात आधार कार्डसाठी पहिल्या टप्प्यात ४ लाख ६३ हजार ९९ तर दुसऱ्या टप्प्यात ७ लाख ३६ हजार ९७१ जणांनी नोंदणी केली. सध्या विविध तीन कंपन्यामार्फत ३९ किट्सच्या मदतीने नोंदणीचे काम सुरु आहे. आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून ११ लाख ९७ हजार ४० जणांनी आधार कार्डची नोंदणी केली असून, अद्यापही जिल्ह्यातील पाच लाख २ हजार २८२ जणांची नोंदणी होणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)तालुकानिहाय झालेली आधार नोंदणी अशीतालुकानोंदणी संख्याउमरगा२५१२९४उस्मानाबाद२४३९८०तुळजापूर२०१७३१कळंब१५९९८६परंडा९४०१६भूम९१०५०लोहारा८४३७४वाशी७०६०९