शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या कमी-अधिक दाबाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

जालना : शहरातील घायाळनगर, लोकमान्य प्राथमिक शाळा परिसरात विजेच्या कमी अधिक दाबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यामुळे विद्युत उपकरणे जळून नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.

जालना : शहरातील घायाळनगर, लोकमान्य प्राथमिक शाळा परिसरात विजेच्या कमी अधिक दाबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यामुळे विद्युत उपकरणे जळून नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.घायाळनगर हे जालना शहराच्या मध्यवस्तीत आहे. गत महिन्यात वादळी वाऱ्यात गांधीचमनवरील खांब कोसळला होता. तो दुरूस्त करण्यात आला आहे. परंतु तेव्हापासून घायाळनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. या वीजपुरवठ्याबाबत येथील नागरिकांनी दोनवेळा लेखी तक्रार गांधीचमन येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दिली आहे. शिवाय दूरध्वनीवरूनही याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कल्पना दिलेली आहे. परंतु यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या कमी अधिक दाबाने विद्युत पंप चालत नाहीत.त्यामुळे पाणी असूनही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळांना पाणी आले तरी नळावरील मोटारीही चालत नाहीत. याशिवाय विजेवर आधारित उपकरणे जळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दूरदर्शनसंच, फ्रीज, पंखे, मिक्सर, लाईट आदी जळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विनाकारण भूर्दंड मात्र, नागरिकांना सहन करावा लागत आहे. कडक उन्हाच्या दिवसात कुलर, पंखे असूनही ते केवळ शोभेच्या वस्तू म्हणून राहिले आहेत.वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून ही समस्या, अशी मागणी पंढरीनाथ चौधरी, प्रविण फुके, लक्ष्मणराव तारो, कोलते, झुंबड, शिंगणे, बुलबुले, विष्णू काळे आदींसह घायाळनगरवासियांनी एका निवेदनाद्वार केली आहे.