शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

घाटीतील सीव्हीटीएसमध्ये होतात केवळ अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी

By admin | Updated: September 29, 2014 00:46 IST

औरंगाबाद : घाटीतील हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभाग (सीव्हीटीएस) केवळ अँजिओग्राफी, टुडी इकोसारख्या तपासण्या आणि अँजिओप्लास्टीपुरताच मर्यादित राहू लागला आहे.

औरंगाबाद : घाटीतील हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभाग (सीव्हीटीएस) केवळ अँजिओग्राफी, टुडी इकोसारख्या तपासण्या आणि अँजिओप्लास्टीपुरताच मर्यादित राहू लागला आहे. या विभागाचा दुसरा उरोशल्यचिकित्सा विभाग सर्जनअभावी बंद पडला आहे. तेथील आॅपरेशन थिएटरमधील उपकरणांना गंज चढू लागला आहे.मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून घाटीची ओळख. घाटीत मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. हृदयविकार आता केवळ श्रीमंताचाच आजार राहिला नाही. कष्टकरी, झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तींनाही हृदयविकार होत आहे. हा विकार असलेले गरीब रुग्ण उपचारासाठी घाटीत दाखल होतात. घाटीत फक्त रुग्णांची अँजिओग्राफी, टुडी इको आदी तपासण्या केल्या जातात. त्यासाठी तेथे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष देशमुख, डॉ. अजित भागवत कार्यरत आहेत. डॉ. देशमुख, डॉ.भागवत आणि सीव्हीटीएसमधील निष्णात पॅरामेडिकल स्टाफ यांच्यामुळे हृदयरोग विभागाचे कामकाज नियमित सुरू असल्याची माहिती सहयोगी प्रा. डॉ. एस. जी. राऊत यांनी दिली. डॉ. राऊत म्हणाले की, सीव्हीटीएसमध्ये आठवड्यातून तीन दिवस अँजिओग्राफी करण्यात येतात. दरमहा साधारणपणे ६० ते ७० रुग्णांची अँजिओग्राफी केली जाते. शिवाय रुग्णांच्या प्रकृतीचे निदान झाल्यानंतर त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये किती अडथळे आहेत, तसेच त्यास अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता आहे अथवा बायपाससारख्या सर्जरीची गरज आहे, याबाबतचे निदान होते. आठ दिवसांतून तीन दिवस रोज रुग्णांवर अँजिओप्लास्टी करावी, अशा सूचना डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नियमित अँजिओप्लास्टी होत असल्याचे डॉ.राऊत म्हणाले. ज्या रुग्णांना बायपास सर्जरी करण्याची गरज आहे आणि ज्यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपचार घ्यावयाचे आहेत, त्यांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. तेथेही त्यांना या योजनेंतर्गत उपचार मिळतात.