शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तात तंटामुक्ती अध्यक्षाची निवड

By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सांगवी घुग्गी या गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे़ त्यामुळे येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होण्यासाठी चुरस निर्माण झाल्याने लोकशाही शासनप्रणाली

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सांगवी घुग्गी या गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे़ त्यामुळे येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होण्यासाठी चुरस निर्माण झाल्याने लोकशाही शासनप्रणाली गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करून पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तात तंटामुक्त अध्यक्षाची निवड करण्यात आली़ या निवड प्रक्रियेत पहिल्यांदाच महिलांनी मोठयाप्रमाणात सहभाग नोंदविल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे़ शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी हे तांडा वसाहत असलेले गु्रप ग्रामपंचायतीचे गाव असल्याने कोणत्याही निवडणुकीत चुरस होताना दिसून येते़ यामध्ये रविवारी झालेल्या तंटामुक्त अध्यक्षाच्या निवडीतही निवडणुकीप्रमाणे चुरस झाली होती़ एकंदर आठ उमेदवारांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होण्यासाठी आपले नामांकनपत्र सादर केले होते़ ताणतणाव वाढू नये यासाठी बंडूपंत मुंडे यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता़ शिवाय, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी ग्रामसेवक शेख यांच्यावर घुग्गी सांगवी या गावातील निवडीची जबाबदारी होती़ विस्तार अधिकारी बालाजी पोतदार हे सुद्धा उपस्थित होते़ एकंदर चुरशीच्या निवडीसाठी गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करण्यात आला़ यामुळे काही उमेदवारांनी आपले नामांकन वापस घेतले़ त्यामुळे विष्णुदास जाधव आणि प्रताप बिरादार यांच्यात लढत होऊन विष्णुदास जाधव यांना २४५ मते तर प्रताप बिराजदार यांना १७४ मते पडली़ (वार्ताहर)महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत विष्णुदास जाधव यांनी २४५ मते घेऊन प्रताप बिरादार यांच्यापेक्षा आघाडी मिळविली़ त्यामुळे अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा गाव व परिसरात आहे़ ४तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दोनवेळा ग्रामसभा बोलावूनही तोडगा न निघाल्याने ग्रामसभा तहकूब झाली होती़ त्यामुळे रविवारी तिसऱ्यांदा ग्रामसभा घेऊन तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आल्याने या प्रक्रियेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला़