शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनो.. थोरा-मोठ्यांच्या वेशभूषेत येऊन जागवा स्मृती.

By admin | Updated: August 11, 2015 00:51 IST

.. औरंगाबाद : ‘हम लाये हे तुफानसे किश्ती निकाल के मेरे देश के बच्चो तुम रखना इसे संभालके...’ अशी अपेक्षा देशातील

..औरंगाबाद : ‘हम लाये हे तुफानसे किश्ती निकाल के मेरे देश के बच्चो तुम रखना इसे संभालके...’ अशी अपेक्षा देशातील बच्चे कंपनीकडून स्वातंत्र्य लढ्यातील शूरवीरांनी व्यक्त केलीय. देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांची वेशभूषा करून बच्चे कंपनीने ‘ मेरा भारत महान’ या देशभक्तीपर उपक्रमात सहभागी व्हावे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील शूरवीरांना अशी आगळीवेगळी आदरांजली वाहण्याची संधी यानिमित्त शहरातील बालगोपालांना उपलब्ध झाली आहे. भारतीय स्वातंत्र्याचा ६८ वा वर्धापन दिन आपण शनिवारी उत्साहात साजरा करीत आहोत. स्वातंत्र्यासाठी ज्या लाखो ज्ञात-अज्ञात शूरवीरांनी आपले सर्वस्व पणाला लावले, त्यांनाही यानिमित्ताने लोकमत व प्रोझोन मॉलतर्फे आयोजित ‘मेरा देश महान’ या उपक्रमांतर्गत १ लाख ११ हजार १११ दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात येणार आहे. या मायभूमीच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी लाखो देशभक्त कामी आले. स्वातंत्र्य लढ्याची ज्योत कायम धगधगती ठेवणाऱ्या निधड्या छातीच्या वीरांच्या वेशभूषा करून लहान मुले, शालेय विद्यार्थी या देशभक्तीच्या सोहळ्यात सहभागी झाले तर स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती बालमनावर कायमच्या कोरल्या जातील. त्यामुळे मुला-मुलींस देशभक्त, इतिहास पुरुषांच्या वेशभूषेत वेगळेपणे सादर करण्याची पालकांनाही ही एक पर्वणीच आहे. गतवर्षी स्वातंत्र्य दिनी १ लाख ४ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रोझोन मॉलमध्ये एकत्र येऊन जाज्वल्य देशभक्तीचे दर्शन घडविले. यंदाचा स्वातंत्र्य दिन अधिक संस्मरणीय करण्यासाठी लोकमत आणि प्रोझोन मॉलतर्फे १ लाख ११ हजार १११ मेणबत्त्या लावण्याचे प्रायोजन आहे. यातील एक दिवा आपल्या व आपल्या मुला-मुलींच्या हस्ते प्रज्वलित व्हावा. त्यानिमित्त शनिवारी (दि.१५) सायंकाळी ५ वाजता प्रोझोन मॉलमध्ये एकत्र येऊन देशभक्तांची वज्रमूठ बांधूया. या सोहळ्याचे सहप्रायोजक ‘रेडिओ मिर्ची ’हे आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश सर्वांनाच खुला आहे.