शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मुलाची झाली मामाशी भेट

By admin | Updated: December 1, 2014 01:26 IST

औरंगाबाद : रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या सतर्कतेने आणि मोबाईल क्रमांक तोंडपाठ असल्यामुळे गाडी सुटल्यामुळे रविवारी रेल्वेस्थानकावर राहिलेल्या दहा वर्षीय मुलाची मामाशी भेट झाली.

औरंगाबाद : रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या सतर्कतेने आणि मोबाईल क्रमांक तोंडपाठ असल्यामुळे गाडी सुटल्यामुळे रविवारी रेल्वेस्थानकावर राहिलेल्या दहा वर्षीय मुलाची मामाशी भेट झाली.रोहित नारायण कच्छवे (रा. मुंबई) असे या मुलाचे नाव आहे. रोहित आपल्या मोठ्या भावाबरोबर तपोवन एक्स्प्रेसने रविवारी मानवतहून मुंबईला जात होता. औरंगाबाद रेल्वेस्थानक येण्याआधी रोहित स्वच्छतागृहात गेला होता. रोहित स्वच्छतागृहातून बाहेर आला त्यावेळी रेल्वे औरंगाबाद रेल्वेस्थानकावर आली होती. याचवेळी उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने रोहित बोगीबाहेर आला. गाडी रवाना होईपर्यंत प्रवाशांच्या गर्दीमुळे त्याला बोगीत चढता आले नाही. रेल्वे रवाना होईपर्यंत त्याची बोगीत चढण्याची धडपड सुरू होती; परंतु रेल्वे निघून गेल्याने त्याला काय करावे सुचेनासे झाले. त्यामुळे गोंधळून गेला. यावेळी रेल्वे सुरक्षाबलाचे कॉन्स्टेबल एस.एस. गायकवाड यांनी रोहितची स्थिती पाहून याबाबत सहायक उपनिरीक्षक किशोर मलकूनाईक यांना माहिती दिली. यावेळी रोहितशी त्यांनी संवाद साधत घरच्यांविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोहितने त्याच्या मामाचा मोबाईल क्रमांक सांगितला. त्यामुळे यावेळी या क्रमांवर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती त्याच्या मामाला देण्यात आली. मामाने याबाबत औरंगाबादेतील रोहितच्या चुलत मामाला माहिती दिली. त्यानंतर रोहितचे चुलत मामा रेल्वे सुरक्षाबलाच्या ठाण्यात आले. यावेळी रोहितने आपल्या चुलत मामाला ओळखले. त्यानंतर त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मोबाईल क्रमांक उपयोगीलहान मुलांनी एखादा मोबाईल क्रमांक पाठ केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. या घटनेतही हेच दिसून आले. त्यामुळे किमान प्रवासादरम्यान तरी लहान मुलांकडे एखादा मोबाईल क्रमांक राहील याची काळजी घेतली पाहिजे, असे सहायक उपनिरीक्षक किशोर मलकूनाईक म्हणाले.