शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

चिकुन गुनियासदृश रुग्ण वाढले

By admin | Updated: July 18, 2014 01:53 IST

शेख महेमूद तमीज , वाळूज महानगर बजाजनगरात डेंग्यू, चिकुन गुनियासदृश रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

शेख महेमूद तमीज ,वाळूज महानगरबजाजनगरात डेंग्यू, चिकुन गुनियासदृश रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. बजाजनगर या कामगार वसाहतीत अजिबात स्वच्छता नाही. या परिसरात खाजगी ठेकेदार साफसफाईचे काम करतात. एमआयडीसीचे काही अधिकारी व ठेकेदारांत हातमिळवणी असल्यामुळे कागदोपत्री स्वच्छता दाखविली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या कामगार वसाहतीतील ड्रेनेज लाईनचे काम रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विविध सेक्टर्समध्ये असलेल्या ड्रेनेज लाईनचे सेफ्टी टँक चोकअप होत असल्यामुळे सांडपाणी उघड्यावर साचत आहे. गेल्या १५ दिवसांपासून या परिसरात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. ताप येणे, मळमळ होणे, थंडी वाजणे, अंग व सांधे दुखणे आदींच्या तक्रारी होत आहेत. बजाजनगरातील सिमेन्स कॉलनी, कणकधारा सोसायटी, काबरा रेसिडेन्सी, श्री गणेशाय गृहनिर्माण संस्था, स्वाध्याय केंद्र परिसरात साथीच्या आजारांचे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभाग व एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे बालाजी खेत्रे, संजय देवकर, चेतन पवार, वंदना कैलास कदम, प्रतीक उमेश पवार, माधवी प्रभू पेठकर या उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सांगितले. याविषयी दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.बी. बामणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बजाजनगरात डेंग्यूचा एक रुग्ण व ६ संशयित रुग्ण आढळल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.बजाजनगरात डेंग्यूसदृश व साथीच्या आजारांचे अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या प्लेटलेटस्ची संख्या कमी होत असल्याचे डॉ. प्रशांत टेमक पाटील, डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. सध्या रुग्णालयात डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण दाखल होत असल्याची माहिती डॉ. टेमक पाटील यांनी दिली.आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षणबजाजनगरात डेंग्यूसदृश व साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्याच्या तक्रारी आल्यामुळे आरोग्य विभागाने १४ जुलैपासून बजाजनगरमध्ये सर्वेक्षण सुरू केले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यू.पी. गंडाळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, खाजगी रुग्णालयांत असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात येत आहे.घराचा परिसर स्वच्छ ठेवा, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिन पाळा याची माहिती सांगितली जात आहे. साफसफाईसाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.अस्वच्छतता वाढलीमी बजाजनगरातील सिमेन्स कॉलनीत राहत. एमआयडीसी प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छता केली जात नाही. कचरा व सांडपाण्याच्या गटारी तुडुंब भरल्याने साथीचे आजार वाढत आहेत.-वंदना कदम, रुग्णरुग्णांची संख्या वाढलीअस्वच्छतेमुळे बजाजनगरातील रहिवाशांना साथीचे आजार होत आहेत. प्रत्येक कुटुंबातील किमान एका जणाला तरी साथीचा आजार आहे. स्वच्छतेकडे एमआयडीसी लक्ष देत नाही.-रघुनाथ पवार, रहिवासीरस्त्यावर कचरा टाकतातबजाजनगरात आरएच-७ मध्ये अनेक दिवसापांसून औषध फवारणी करण्यात आलेली नाही. बहुतांश ठिकाणी कचराकुंड्यांची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक रस्त्यावरच केरकचरा आणून टाकतात. -माधवी प्रभू पेठकर, रुग्ण