वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:02 IST2026-04-03T12:57:59+5:302026-04-03T13:02:20+5:30
Chhatrapati Sambhajinagar Crime: मृदंगाचार्य म्हणून मिरवणाऱ्या अमोल लघाणे याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. काजलचे अमोल लघाणेसोबत वर्षभरापू्र्वीच लग्न झाले होते.

वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
कीर्तनात मृदंग वाजवत असल्याने मृदंगाचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल लघाणे याच्या पत्नीने आत्महत्या केली. या आत्महत्येच्या घटनेनंतर स्फोटक माहिती समोर आली आहे. अमोल लघाणेचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते, पण दुसऱ्या महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्याबद्दल पत्नी काजलला कळले होते. त्यातूनच तो पत्नीला मारहाण करायचा आणि धमक्या देत होता. या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. १ एप्रिल रोजी ही घटना घडली.
अमोल लघाणे याने लग्नानंतरही दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध सुरूच ठेवले होते. त्यातूनच वाद वाढत गेले आणि पत्नी काजलने कंटाळून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
अमोल लघाणेबद्दल एफआरआयमध्ये काय?
मृदंगाचार्य अमोल लघाणे हा छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या रांजणगाव शेणपूंजी येथील रहिवासी आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेल्या अण्णासाहेब केशवराव जाधव यांची मुलगी काजल जाधव हिचे लग्न अमोल लघाणेसोबत झाले होते.
२५ मार्च २०२५ मध्ये दोघांचे लग्न झाले. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं. मात्र काही महिन्यांनी अमोल याचे दुसऱ्या महिलेसोबतही अनैतिक संबंध असल्याचे काजल हिला कळले. त्याबद्दल ती अमोलला विचारायची. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले.
काजलला मारहाण, मानसिक त्रास आणि धमक्या
काजलकडून सातत्याने अनैतिक संबंधांबद्दल विचारणा केली जात असल्याने अमोल लघाणे हा तिला मारहाण करू लागला. तिला शिवीगाळ करायचा आणि मानसिक, शारीरिक त्रास देणे सुरू होते. काजले हा सगळा प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला.
काजल घरातच संपवले आयुष्य
काजलच्या आईवडिलांनी अमोल लघाणेला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, तो उद्धटपणे बोलला. त्यानंतरही त्याच्या धमक्या देणे सुरूच होते. त्यामुळे काजल मानसिकदृष्ट्या खचली.
दरम्यान, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास काजले घरातच गळफास घेतला. तिच्या सासऱ्याने तिला लटकलेल्या अवस्थेत बघितले. त्यांनी आवाज करत इतरा बोलावले आणि तातडीने घाटी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.