शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

वळणावर भरधाव ट्रकने चिरडले; बाजाराला जाणाऱ्या बाप-लेकाचा भीषण अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:17 IST

वळणावर ट्रकच्या धडकेत बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; बाजाराला जाताना भीषण अपघात

खुलताबाद: खुलताबाद येथील आठवडी बाजारासाठी मोटारसायकलवरून येणाऱ्या एका कुटुंबावर काळाने भीषण झडप घातली आहे. खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नंद्राबाद गावाजवळील वळणावर ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत पित्याचा जागीच मृत्यू झाला, तर दीड वर्षाच्या चिमुकल्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गेला. या अपघातात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हा थरार घडला.

किशोर छबुलाल सोनवणे (वय ३७, रा. रायपूर-डोणगाव, ता. गंगापूर, सध्या मु. कागजीपुरा) असे मृत वडिलांचे नाव असून, शिवा किशोर सोनवणे (वय १.५ वर्षे) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

वळणावर आयशरने उडवले; दृश्य होते भयावहमिळालेल्या माहितीनुसार, किशोर सोनवणे हे कागजीपुरा येथील एका वीटभट्टीवर कामगार म्हणून रुजू झाले होते. बुधवारी खुलताबादचा आठवडी बाजार असल्याने ते पत्नी पूजा (वय २७) आणि मुलगा शिवा यांच्यासह विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून येत होते. नंद्राबाद जवळील वळणावर समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने (MH 21 BH 4338) त्यांच्या गाडीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, किशोर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगा बाजूला फेकले गेले.

दीड वर्षाच्या शिवाचा रुग्णालयात अंतअपघाताचे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, चिमुकल्या शिवाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले. जखमी पूजा सोनवणे यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. किशोर सोनवणे हे आठच दिवसांपूर्वी वीटभट्टीवर कामाला आले होते, त्यापूर्वी ते ऊसतोड कामगार म्हणून कार्यरत होते.

परिसरात हळहळ; ट्रक चालकावर गुन्हा दाखलघटनेची माहिती मिळताच बीट जमादार किशोर गवळी, जाकीर शेख, सिद्धार्थ सदावर्ते आणि होमगार्ड महेश तुपे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आयशर ट्रक जप्त केला असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes: Father, Toddler Son Killed in Truck Collision

Web Summary : A father and his 1.5-year-old son died in a tragic road accident near Khultabad. A truck collided with their motorcycle, also critically injuring the man's wife. The accident occurred near Nandrabad village. Police are investigating.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू