शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: October 29, 2014 00:44 IST

कळंब : मुलाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवित एकाची फसवणूक केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह तिघाविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून कळंब पोलिस ठाण्यात

कळंब : मुलाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवित एकाची फसवणूक केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह तिघाविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून कळंब पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहरातील पुनर्वसन सावरगाव येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी महादेव विठ्ठल टोपे हे त्यांच्या मुलासाठी नोकरी पाहत होते़ त्यांना मंडळ अधिकारी बबन विठ्ठल आडसूळ यांनी आपला मेहुणा सुभाष जाधव हा कृषी अधिकारी असून, अनेकांना त्याने नोकरी लावल्याचे सांगितले़ तुमच्या मुलाला कृषी खात्यात नोकरी लावतो असे म्हणत पाच लाख रूपये द्यावे लागतील, असेही आडसूळ यांनी सांगितले़ आडसूळ यांच्या सांगण्यानुसार मुलाला नोकरी लागेल या आशेने महादेव टोपे यांनी १४ डिसेंबर २०११ रोजी आडसूळ यांना तीन लाख रूपये बँकेतून काढून दिले़ नोकरीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने टोपे यांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आले़ त्यांनी कळंब पोलिस ठाण्यात या प्रकरणात धाव घेतली होती़ मात्र, तेथे त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी अ‍ॅड़ गोविंद जाधवर यांच्या मार्फत न्यायालयात धाव घेतली होती़ न्यायालयाच्या आदेशावरून मंडळ अधिकारी बबन आडसूळ, सुभाष जाधव, दत्ता आडसूळ या तिघाविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले़ न्यायालयाच्या आदेशावरून या तिघाविरूध्द फसवणुकीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे हे करीत आहेत़ (वार्ताहर)