शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे प्रकल्पासाठी २२३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र शासनाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:25 IST

निळवंडे प्रकल्पासाठी २२३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र शासनाच्या गुंतवणूक मान्यता समितीने परवानगी दिली आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करावयाचा आहे, असे २५ फेब्रुवारी २०१९ चे पत्र आणि बैठकीचा कार्य अहवाल केंद्र शासनाचे वकील असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी गुरुवारी (दि.२८) खंडपीठात सादर केला. यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ६ तालुके आणि नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्यामधील एकूण १८२ गावांमधील ८६,१०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.

ठळक मुद्देपाच वर्षांत पूर्ण करावयाच्या या प्रकल्पाला गती मिळणार

औरंगाबाद : निळवंडे प्रकल्पासाठी २२३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र शासनाच्या गुंतवणूक मान्यता समितीने परवानगी दिली आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करावयाचा आहे, असे २५ फेब्रुवारी २०१९ चे पत्र आणि बैठकीचा कार्य अहवाल केंद्र शासनाचे वकील असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी गुरुवारी (दि.२८) खंडपीठात सादर केला. यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ६ तालुके आणि नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्यामधील एकूण १८२ गावांमधील ८६,१०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. याचिकेची पुढील सुनावणी ७ मार्च रोजी होणार आहे.वरील अहवालात राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार निळवंडे प्रकल्पाची साठवणक्षमता २३६ दलघमी आहे. त्यातील २३२.१८ दलघमी जिवंत साठा असून, पिण्याच्या पाण्यासाठी १३.१५ दलघमीची तरतूद आहे. या प्रकल्पातून ११.६० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकेल.या प्रकल्पावर राज्य शासनाने डिसेंबर २०१८ पर्यंत ९७४.३२ कोटी रुपये खर्च केला आहे. डावा कालवा ८५ कि.मी. असून, उजवा कालवा ९७ कि.मी.आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करावयाचा असला तरी मुख्य धरण तयार असल्यामुळे ३ ते ४ वर्षांतच प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे.आज राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, गोदावरी महामंडळातर्फे अ‍ॅड. बाबूराव आर. सुरवसे, शिर्डी संस्थानतर्फे अ‍ॅड. नितीन भवर, हस्तक्षेपकातर्फे अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांनी काम पाहिले.--------------

टॅग्स :Courtन्यायालयDamधरण