शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: July 28, 2014 01:01 IST

औंढा नागनाथ : बारापैैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथाचे पहिल्या श्रावण सोमवारी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रविवारच्या रात्रीपासूनच गर्दी केली आहे.

औंढा नागनाथ : बारापैैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथाचे पहिल्या श्रावण सोमवारी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रविवारच्या रात्रीपासूनच गर्दी केली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याचे तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी सांगितले.श्रावण मासात औंढा नागनाथ येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी वाढते. त्यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे म्हणून मंदिर प्रशासनाने मंदिराच्या आतमध्ये नामदेव सभामंडपात स्टिल बॅरेकेटस् बसविल्या आहेत. तर पश्चिम द्वारासमोर भाविकांसाठी टीनशेडचे बॅरिकेटिंग केले. आता भर पावसातदेखील रांगेत उभे राहून दर्शन घेण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्थेचे नियोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले. दर्शन सुरळीत व्हावे म्हणून धर्माथी, देणगी व विशेष दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली. रांगेद्वारे किमान दोन तासांत भाविकाला दर्शन घेऊन बाहेर पडता यावे, असा प्रयत्न आहे. मंदिरात गर्भगृहामध्ये जाण्याचा व येण्याचा एकच रस्ता असल्याने दर्शन घेण्यास येथे विलंब लागतो. त्यासाठी सभामंडपामध्ये ठिकठिकाणी सीसीडी बसविल्या आहेत. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मंदिरामध्ये व भोवती १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून ते सुरळीत सुरू असल्याची खात्री पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, डीवायएसपी नीलेश मोरे, पीआय सुनील रसाळ यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी मंदिराच्या तिन्ही दिशेला पोलिस टॉवर उभारले आहेत. २७ जुलै ते २५ आॅगस्टपर्यंत श्रावणमास असल्याने या महिन्यामध्ये १ आॅगस्ट नागपंचमी, १० आॅगस्ट रोजी रक्षाबंधन, पोळा, अमावस्या असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने २७ पोलिस अधिकारी, १३८ पोलिस कर्मचारी, ६० होमगार्ड व मंदिर संस्थानचे ३० सुरक्षारक्षक तैैनात करण्यात आले आहेत. तर मंदिरामध्ये प्रथमोपचारासाठी वैैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक महिन्यासाठी नियुक्ती केली असून तसा स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तसेच वीज वितरण कंपनी, राज्य परिवहन महामंडळ, ग्रामपंचायत यांना पत्र पाठवून सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे तहसीलदार मदनूरकर यांनी सांगितले. श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी रविवारच्या मध्यरात्री २.३० वाजता ‘श्रीं’चे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे सचिव दिलीप चव्हाण यांनी दिली.पहिल्या श्रावण सोमवारची महापूजाश्रावण महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवारी खा. राजीव सातव, तहसीलदार श्याम मदनूरकर, विश्वस्त डॉ. निलावार यांच्या हस्ते ‘श्रीं’ची महापूजा करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. औंढा, हिंगोलीतील उपाययोजना औंढा येथील १२ ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथाचे श्रावण महिन्यानिमित्त राज्यातील लाखो भाविक दर्शन घेतात. परजिल्ह्यातून आणि जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने हिंगोली आगाराकडून नेहमीपेक्षा जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. हिंदू धर्मियांसाठी श्रावण महिना पवित्र असल्याने देशभरात मोठ्या उत्सवात साजरे होणारे पूजाविधी हिंगोली येथील जलेश्वर मंदिर संस्थानने आयोजित केले आहेत.सोमवारी मंदिराच्या ३०० मीटर अंतरावर प्रसादाचे साहित्य, बेलफूल मिळणार.प्रत्येक श्रावण सोमवारी मंदिर परिसरात वाहनांना बंदी तसेच ठराविक अंतरावर पार्किंगची व्यवस्था केली आहे..