शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: December 1, 2014 00:51 IST

केवल चौधरी ,जालना शहर वासीयांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गर्दी व महत्त्वाच्या ३५ ठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आ

केवल चौधरी ,जालनाशहर वासीयांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गर्दी व महत्त्वाच्या ३५ ठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आठ दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ४४ लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जाणीवपूर्वक दखल घेऊन हा अभिनव प्रयोग मराठवाड्यात प्रथमच राबविण्यासाठी सहकार्य केल्याचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले. संपूर्ण शहर सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या नियंत्रणात आले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. हे कॅमेरे व्हाय-फाय यंत्रणेद्वारे जोडण्यात आले असून सौर ऊर्जेवर आधारित आहेत. २५ ते ३५ फूट उंचीवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहराचा ५० टक्के भाग नियंत्रणात येणार आहे. दीड लाख लोकांना तूर्तास या निगराणीखालून वावरावे लागेल. शिवाय शहरात साजरे होणारे विविध उत्सव व धार्मिक कार्यक्रमांमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच महिला-मुलींची छेड काढणाऱ्यांना टिपले जाणार आहे. हे काम अगदी सहज व कोणालाही अजिबात खबर न लागता होणार असल्याने रात्रीच्या अंधारातही अगदी उजळ प्रतिमा टिपली जाणार आहे. ४सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने ४४ लाख रूपये उपलब्ध करून दिले आहेत. ही यंत्रणा उभारणारी जालना नगर पालिका मराठवाड्यात एकमेव आहे. ४पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले, मुख्य बाजार पेठेत होणारे गैरप्रकार रोखण्यात मोठी मदत होणार असून रात्रीच्या गस्तीत पोलिसांच्या नजरेतून सुटणारे गैरप्रकारही कॅमेऱ्यात टिपले जाणार आहेत.४चार ठिकाणी मॉनिटरवर हे चित्रण दिसणार आहे. यात शहरातील दोन्ही पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक कार्यालय, नगर पालिका कार्यालय दिसू शकेल. या चारही ठिकाणी चित्रण दिसणार असले तरी नियंत्रण मात्र एकाच ठिकाणी राहील. ४नगराध्यक्षा पार्वतीबाई रत्नपारखे यांनी सांगितले, शहरातील स्वच्छता पाहण्यासाठी आपल्याला मोठा लाभ होणार आहे. आपल्या कार्यकाळात हे काम आहे, याचे समाधान आहे.