शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेअगोदर कव्हेकरांची ‘शांती’?

By admin | Updated: September 21, 2014 00:26 IST

लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपल्या गटाची वर्णी लागावी म्हणून काँग्रेसअंतर्गतच्या दोन्ही गटांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत़ सर्वसामान्यांचे विधानसभेकडे तर

लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपल्या गटाची वर्णी लागावी म्हणून काँग्रेसअंतर्गतच्या दोन्ही गटांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत़ सर्वसामान्यांचे विधानसभेकडे तर काँग्रेसच्या नेतेमंडळींचे या निवडीवर विशेष लक्ष केंद्रित झाले आहे़ दरम्यान, विधानसभा निवडणुकीअगोदर माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या पत्नीस अध्यक्षपद देऊन त्यांची ‘शांती’ करणार काय? ही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे़ तसेच कव्हेकरांच्या जागेवर दुसऱ्याच निष्ठावंत कार्यकर्त्याची वर्णी लावून कव्हेकरांना टाळण्यात येणार का? अशीही चर्चा आहे़ जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत नव्या अध्यक्षाची निवड रविवारी होत आहे़ आपल्या गटाचे प्राबल्य कायम असल्याचे दर्शविण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी काही ‘तडजोडी’ करण्यावर भर देण्यात आला आहे़ लातूर जिल्हा परिषदेवर सध्या काँग्रेसची एकहाती सत्ता आहे़ यात काँग्रेसचे ३५, राष्ट्रवादीचे ९, भाजपाचे ८, शिवसेनेचे ५ आणि मनसेचा एक सदस्य आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी खुले असल्याने शुक्रवारपर्यंत पाच महिला सदस्यांच्या नावावर जोरदार चर्चा सुरु होती़ यात जिल्हा परिषदेच्या विद्यमान महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील- कव्हेकर, अ‍ॅड़ जयश्री पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, सपना घुगे, सविता कारभारी यांची नावे होती़ शनिवारी मात्र, पाचपैकी दोन नावे मागे पडली आणि प्रतिभाताई- पाटील कव्हेकर, अ‍ॅड़ जयश्री पाटील आणि ज्योती पवार यांच्या नावावर जोरदार चर्चा सुरु झाली़ दरम्यान, सायंकाळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची, निवडक सदस्यांची बैठकही घेण्यात आली़ यात तीन नावांवर बराच वेळ खल सुरु होता़ अध्यक्षपदासाठी एकाच नावावर शिक्कामोर्तब होत नव्हते़ अशातच पवार नावावर ‘वार’ पडला़ परंतु, दोन्हीपैकी एका नावावर निर्णय होऊ शकला नाही़ रविवारी होणारी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठीची निवड ही विधानसभेची रंगीत तालीम आहे़ त्यामुळे काँग्रेसमधील निलंगेकर व देशमुख गट हे दोन्ही गट विधानसभा निवडणुकीवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून विशेष काळजी घेत आहेत़ दोन्ही गटांकडून नाममात्ररित्या मते जाणून घेण्यात आली असल्याचे काँग्रेसमधील सदस्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)शिरूर अनंतपाळ गटातून निवडून आलेल्या अ‍ॅड़ जयश्री पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद द्यावे म्हणून लिंगायत समाज आग्रही आहे़ जिल्ह्यात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे़ परंतु, अद्याप एकदाही या समाजातील व्यक्तीला जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी मिळाली नाही़ त्यामुळे यावेळी अ‍ॅड़ पाटील यांना अध्यक्षपद मिळाले पाहिजे, यासाठी या समाजाने काँग्रेसच्या नेतेमंडळींपुढे आग्रह धरला आहे़ परंतु, त्याचा कितपत प्रभाव पडतो, हे आजघडीला सांगणे कठीण ठरत आहे़