शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खांबाळा प्रकरणी पोलिस पथक आरोपींच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 14:25 IST

कुरूंदा : स्वस्त धान्य दुकानदाराने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गावातील सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्षासह ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल असून त्यांच्या शोधात पोलिस पथक पाठविले आहे.

कुरूंदा : वसमत तालुक्यातील खांबाळा येथे स्वस्त धान्य दुकानदाराने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गावातील सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्षासह ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल असून त्यांच्या शोधात पोलिस पथक पाठविले आहे. शनिवारी या गावास डीवायएसपी पियूष जगताप यांनी भेट दिली. खांबाळा येथील स्वस्त धान्य दुकानदार मयत सटवा कचरू हाटकर यांना गावातील मंडळी गेल्या दोन महिन्यांपासून स्वस्त धान्यावरून वाद घालून सप्ताहासाठी धान्याच्या मालाची मागणी करीत होते. हे प्रकरण गेल्या महिन्यात तहसीलदारपर्यंत गेले होते. तेव्हा प्रतिबंधक कार्यकाही केल्याचे कुरूंदा पोलिसांनी सांगितले. हा वाद थांबण्याऐवजी उलट वाढत गेल्याने स्वस्तधान्य दुकानदार सटवा हाटकर यांनी १० मार्च रोजी जाळून घेतले. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयताची पत्नी शकुंतलाबाई यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला होता. पोलिस पथकाने आरोपीच्या शोधामध्ये गाव व आखाडे पिंजून काढले मात्र ते हाती लागले नाही. घटना घडून गेल्यानंतर महसूल प्रशासन आता गंभीर झाल्याचे दिसत आहे. पोलिसांनीही गावात दोन कर्मचारी ठेवले होते. (वार्ताहर)तहसीलदार नांदे यांची भेटखांबाळा येथे स्वस्त धान्याच्या वादातून दुकानदार सटवा हाटकर यांनी आत्महत्या केल्याने शनिवारी ४ वाजण्याच्या सुमारास वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी भेट दिली. तहसीलदार नांदे यांनी मयताच्या नातेवाईकांशी चर्चा करून माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत मंडळ अधिकारी अंभोरे, तलाठी मेहत्तरे आदींची उपस्थिती होती. या प्रकरणाचे गांभीर्य पाहूून तहसील प्रशासनाने खांबाळा येथे भेट दिली.