शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

कॅनॉल गळतीमुळे धबधबा वाहू लागला

By admin | Updated: May 12, 2014 00:07 IST

नळदुर्ग : कॅनॉलला लागलेल्या गळतीमुळे नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी या दोनैपकी मादी धबधब्यातून गेल्या चार दिवसांपासून पाणी वाहू लागल्याचे दिसत आहे.

 नळदुर्ग : कॅनॉलला लागलेल्या गळतीमुळे नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी या दोनैपकी मादी धबधब्यातून गेल्या चार दिवसांपासून पाणी वाहू लागल्याचे दिसत आहे. मागील जून-जुलै महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने नर-मादी धबधबे ओसंडून वाहन होते. पंधरा दिवस चालणार्‍या या प्रवाहाचे रूप पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. परंतु, आजरोजी या बोरी धरणात केवळ १०.७५ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा असून, दररोज कालव्यातून ०.११७२ दमी पाणी बाहेर पडत आहे. दहा किमी लांबीच्या या कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. नदीकाठावरून जाणार्‍या कालव्यातून गळती लागल्याने व झिरपलेले पाण किल्ल्यातील साठवण तलावात गेल्याने तलाव तुडूंब भरला आहे. तलाव भरल्यानंतर जास्तीचे पाणी नर-मादी धबधब्यातून वाहते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कमी उंचीवर असलेल्या मादी धबधब्यातून हे पाणी वाहत आहे. विजापूरच्या इब्राहीम आदिलशहाने १६६३ मध्ये येथील बोरी नदीवर किल्ल्यात धरण बांधलेले आहे. या धरणाचा बंधारा संपूर्ण दगडी आहे. १७४ मिटर लांब, अडीच ते चौदा मिटर रूंद व २९ मिटर उंच असणार्‍या या बंधार्‍याच्या पोटात अत्यंत हवेशीर जलमहल बांधण्यात आला आहे. या महालावर दोन्ही बाजुला सांडवे सोडलेले असून, त्यातून विसर्ग होणार्‍या पाण्याची पातळी कमी-जास्त करण्यात आली आहे. जेव्हा धरण भरून सांडव्यातून पाणी वाहते तेव्हा कमी उंचीच्या सांडव्यातून ते बाहेर पडते. यालाच मादी धबधबा म्हणतात. या कृत्रिम परंतु नैसर्गिकतेची झलक दाखविणार्‍या धबधब्याची उंची १९ मिटर आहे. पाटबंधारे विभागाकडून कॅनॉल दुरूस्तीवर दरवर्षी लाखो रूपये खर्च दाखविला जातो. सध्या कॅनॉलमधून सुटणारे पाणी शेतकर्‍यांपर्यंत पोहोंचत नाही. दरम्यान, याबाबत रखवालदार रमेश कांबळे म्हणाले, उन्हाळ्यात नर-मादी धबधब्याला पाणी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॅनॉलला लागलेल्या गळतीमुळे मादी धबधब्यातून गेल्या चार दिवसापासून पाणी पडत आहे. (वार्ताहर)