शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भरतीला उमेदवारांची दांडी

By admin | Updated: June 7, 2014 00:26 IST

नांदेड : जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे़

नांदेड : जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे़ पहिल्या दिवशी शारिरीक क्षमता आणि कागदपत्रांची पडताळणी व चेस्ट क्रमांकाचे वाटप करण्यात आले़ परंतु आज बोलाविण्यात आलेल्या ९०० उमेदवारांपैकी तब्बल ३०० हून अधिक उमेदवारांनी दांडी मारली आहे़ नांदेडचे तापमान सध्या ४२ अंशावर आहे़ त्यामुळे भरती प्रक्रियेतील सर्व चाचण्या उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच उरकण्यावर अधिक भर देण्यात आला होता़ त्यासाठी पहाटे पाचपासूनच भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती़ रिक्त असलेल्या ७२ जागांसाठी पुरुष व महिला मिळून एकुण १९८५ उमेदवारांनी आवेदन पत्र दाखल केले आहे़ शुक्रवारी पहिल्या दिवशी त्यातील ९०० उमेदवारांना उंची, छाती आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलाविण्यात आले होते़ परंतु आजची भरती प्रक्रिया संपण्याच्या वेळेपर्यंत फक्त ५६० उमेदवारांनीच भरतीत सहभाग घेतला होता़ त्यात तीनशेहून अधिक जणांनी मात्र भरती प्रक्रियेला दांडी मारली़ दररोज ६०० उमेदवारांना शारिरीक क्षमता आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येत आहे़ ७ आणि ८ जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे़ त्यानंतर १०,११ व १२ जून रोजी मैदानी चाचणी होणार आहे तर १५ जून रोजी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे़ या सर्व भरती प्रक्रियेवर सीसी टिव्हीचा वॉच राहणार आहे़ उमेदवारांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून मैदानावर सावलीची व्यवस्था करण्यात आली होती़ तसेच पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचारसाठीही वेगळी सोय होती़ कागदपत्रांची पडताळणी करण्यात उमेदवारांची तारांबळ उडू नये म्हणून प्रवर्गनिहाय खिडक्या सुरु करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे काही मिनिटातच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे शक्य झाले़ त्यामुळे भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे़(प्रतिनिधी)वरिष्ठांकडून उमेदवारांच्या शंकाचे निरसनकाही उमेदवारांनी आपली उंची, छाती मोजमापाच्या बाबतीत तक्रार केल्यास पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे स्वताहा संबधित उमेदवारांची दुसऱ्यांदा उंची आणि छाती मोजत असल्याचे पहावयास मिळाले़कागदपत्रे पडताळणी करीत असताना किंवा एखादा अर्ज भरताना उमेदवारांना काही अडचणी आल्यास या ठिकाणचे पोलिस कर्मचारी त्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे पहावयास मिळाले़ तसेच पडताळणी दरम्यान, कागदपत्राची झेरॉक्स कमी पडली अन ती आणण्यासाठी बाहेर जायचे असल्यास येथील एक कर्मचारी उमेदवासोबत देण्यात येत आहे़